Bike rider killed : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईक स्वार जागीच ठार…!
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यातील शिरड (वाणी) या गावाच येथील युवाशेतकरी आपल्या घरगुती कामानिमित्त परभणी येथे गेले होते. ते काम आटोपून वारंगा हायवे रोड मार्ग आपल्या गावाकडे निघाले असता बरडशेवाळा या गावाच्यावळच्या बायपासवर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच - मृत्यू झाला आहे.
ही घटना सोमवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली या बाबत मिळालेली माहीती नुसार हदगाव तालुक्यातील शिरड (वाणी) येथील युवा शेतकरी गजानन राऊत (28) हे काही कामा निमित्त आपल्या काही खासगी कामा निमित्त परभणी जिल्ह्यात येथे गेले होते तो तेथून गावाकडे निघाला असता रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बरडशेवाळा गावाच्या बायपास वर आज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे.
त्याच्या पश्चात पत्नी, आई, बहीण असा परिवार आहे. . रात्री ९.३० वाजेपर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल...
