नवीन नांदेड l विष्णुपुरी येथे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव हभप चंद्रकांत लाठकर महाराज यांच्या गुलालाचा किर्तनाने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते तर अखंड हरिनाम सप्ताहाची 17 मार्च रोजी सांगता होणार आहे.


व धारूमात मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संत जगद्गुरू तुकाराम महाराज अमृत महोत्सव सदैह वैकुंठ गमन व श्रीराम कथा सोहळा दि.१० ते १७ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला होता ,१७ मार्च रोजी हभप वैजनाथ महाराज कागदे यांच्या काल्याचे किर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे याही तिसाव्या वर्षी वर्षी विष्णुपुरी येथे १० ते १७ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह मौजे विष्णुपूरी ता.जि. नांदेड संत जगद्गुरू तुकाराम महाराज त्रिशतोकोतर अमृत महोत्सव सदैह वैकुंठ गमन राम कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सप्ताह मध्ये ह.भ.प.पंढरीनाथ महाराज मुरूकुटे, ह.भ.प.उध्दव महाराज राहटीकर, हभप अशोक महाराज इदके आळंदीकर, ह.भ.प.ॲड.यादव महाराज वाईकर, ह.भ.प.योगेश महाराज वसमतकर, ह.भ.प.शिवा महाराज कळमनुरीकर, ह.भ.प.आत्माराम महाराज पोलीस वाडीकर, यांचे किर्तन संपन्न झाले, असून १६ मार्च रोजी श्रीरामकथा सांगता व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बिजोत्त्सव निमित्ताने दहा वाजता ह.भ.प. चंद्रकांत लाठकर महाराज यांचे गुलालाचे किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरपंच प्रतिनिधी विलास हंबर्डे, ऊपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे,जेष्ठ नागरिक बाबुराव हंबर्डे, उध्दव हंबर्डे, दिपक हंबर्डे, माधव हंबर्डे, मारोती हंबर्डे, रामराव हंबर्डे, राजेश हंबर्डे, बालाजी हंबर्डे, प्रकाश हंबर्डे, याच्या सह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.