नवीन नांदेड l सत्य श्री हनुमान मंदिर जुना कौठा नांदेड येथे 16ते 23 फेब्रुवारी पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह,व लक्ष्मण शक्ती सोहळा आयोजित करण्यात आला असून 22 लक्ष्मण शक्ती आयोजित करण्यात आली आहे.


वै.ह.भ.प. प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरुवात झालेल अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सत्य श्री हनुमान मंदिर कौठा (जुना), ता.जि.नांदेड पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.१६ फेब्रुवारी २५ रोज पासूनदि.२३-२-२०२५ रोज रविवार पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह तसेच लक्ष्मण शक्ती सोहळा दि.२२-लक्षमण २५ रोज शनिवारी आयोजित केला आहे.

सप्ताहातील दैनंदीन कार्यक्रमाची रुपरेषा प्रारंभ १६ फेब्रुवारी २५ रोजी होत असुन पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन, पारी १२ ते २ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम,२ ते ४भावार्थ रामायणातील सुंदर कांडाचे वाचन, ४ ते ५ प्रवचन, ५ ते ७ हरीपाठ व रात्री ८ते१० हरीकिर्तन नंतर हरि जागर. ज्ञानेश्वरी व्यासपीठ: श्री बालाजी माऊली गोरे हे राहणार आहेत.

या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दि.१६ फेब्रुवारी २५रोजी कीर्तनकार हभप. बालकिर्तनकार अक्षय महाराज मोरे,आळंदी देवाची तर ,दि.१७ कीर्तनकार,हभप.उध्दव महाराज भारती,दि.१८ रोजी कीर्तनकार हभप.परमेश्वर महाराज कंधारकर, दि.१९कीर्तनकार सौ.हभप.मैनाताई म. हिप्पळनारीकर, दि. २० फेब्रुवारी कीर्तनकार हभप.शंकर महाराज लोंढे,दि.२१ रोजी कीर्तनकार हभप. नंदकिशोर महाराज आहेर अजर सोंडकर, दि.२२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते २ दिंडी सोहळा व मिरवणुक, दुपारी २ ते ४ पुजेचे किर्तन हभप ,राम महाराज पिंपळगावकर सायं.६श्री लक्ष्मण शक्त्ती सोहळ्यास प्रारंभ, दि.२३रोजी श्रीहभप,भाऊ साहेब महाराज पावडेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी ७ ते ८ पर्यंत होईल.

नंतर महाप्रसाद होईल. ज्ञानेश्वरी पालखी मिरवणुक व मोफत भव्य रोग निदान शिबीर व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले या शिबीरीचा लाभ रूग्णांनी घ्यावा व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी जुना कौठा यांनी केले आहे.