Akhand Harinam ; सत्य श्री हनुमान मंदिर जुना कौठा येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन
नवीन नांदेड l सत्य श्री हनुमान मंदिर जुना कौठा नांदेड येथे 16ते 23 फेब्रुवारी पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह,व लक्ष्मण शक्ती सोहळा आयोजित करण्यात आला असून 22 लक्ष्मण शक्ती आयोजित करण्यात आली आहे.
वै.ह.भ.प. प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरुवात झालेल अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सत्य श्री हनुमान मंदिर कौठा (जुना), ता.जि.नांदेड पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.१६ फेब्रुवारी २५ रोज पासूनदि.२३-२-२०२५ रोज रविवार पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह तसेच लक्ष्मण शक्ती सोहळा दि.२२-लक्षमण २५ रोज शनिवारी आयोजित केला आहे.
सप्ताहातील दैनंदीन कार्यक्रमाची रुपरेषा प्रारंभ १६ फेब्रुवारी २५ रोजी होत असुन पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७ ते...
