हदगाव/नांदेड| नांदेडच्या तामसा शहरात आज स्थानिक नागरिकांचा संताप पहायला मिळाला आहे. शहरातील एका मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार (Headmaster of Tamsa molested minor girl by giving them gungi medicine) केला. त्यानंतर मुलीला तुझा व्हीडिओ माझ्याकडे असल्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. यातून गर्भवती झालेल्या या मुलीला मुख्याध्यापकाने नांदेडला नेऊन तिचा गर्भपात केला आहे. मानुसकिला काळीमा फासनाऱ्या घटनेच्या विरोधात तामसा येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन निषेध केला आहे. आणि आरोपीवर कठोरात काठो कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील एका शाळेचा मुख्याध्यापक तथा राजकीय नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या राजूसिंह चौव्हाण याने नांदेडचे पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखविण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन विद्यार्थिनीला चारचाकी वाहनातून सोबत नेले. आणि पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Nanded Crime News) केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून वारंवार विद्यार्थिनीवर बलात्कार करत होता. याचं बरोबर पीडित विद्यार्थिनी गरोदर राहिल्याने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थींनीचा गर्भपात केला आहे.

दरम्यान घडलेला प्रकार कुटुंबियांना लक्षात आला. यामुळे मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. याचा सर्वांनाच धक्का बसला… आईच्या मदतीने पीडित मुलीने तामसा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अट्रोसिटीसह विविध कलमा अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अत्याचाराच्या विरोधात आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
