Headmaster of Tamsa molested minor girl : तामसा येथील मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार
हदगाव/नांदेड| नांदेडच्या तामसा शहरात आज स्थानिक नागरिकांचा संताप पहायला मिळाला आहे. शहरातील एका मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार (Headmaster of Tamsa molested minor girl by giving them gungi medicine) केला. त्यानंतर मुलीला तुझा व्हीडिओ माझ्याकडे असल्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. यातून गर्भवती झालेल्या या मुलीला मुख्याध्यापकाने नांदेडला नेऊन तिचा गर्भपात केला आहे. मानुसकिला काळीमा फासनाऱ्या घटनेच्या विरोधात तामसा येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन निषेध केला आहे. आणि आरोपीवर कठोरात काठो कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील एका शाळेचा मुख्याध्यापक तथा राजकीय नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या राजूसिंह चौव्हाण याने नांदेडचे पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखविण्याचा बहाणा करत ए...
