किनवट, परमेश्वर पेशवे। केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हरघर जल ही योजना जल जीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून किनवट तालुक्यातील आती दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या इस्लापूर सारख्या ठिकाणी योजनेसाठी तब्बल 7 कोटी 67 लक्ष 86 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या महत्वकांक्षी योजनेची तांत्रिक मान्यता दिनांक 14 /10 /2022 रोजी मिळाली असून या योजनेचा कार्यारंभ आदेश 27/ 12 /2022 रोजी निघाला. या योजनेच्या माध्यमातून अप्रोच चॅनल ,आवक वीहिर जोडघर, वीहिर,जोडपूल यासाठी 1 कोटी 28 लाख रुपयांचा निधी, अशुद्ध जलपंपिंग मशिनरी साठी 80 लक्ष 64 हजार रुपयांचा निधी, जलशुद्धीकरण केंद्र शुद्ध जलपंपिंग मशिनरी ,पाण्याच्या उंच टाक्या ज्याची क्षमता 3 लक्ष 21 हजार लिटर उंची 12 मीटर दुसरी टाकी 1 लाख 7 हजार लिटर, या स्वरूपाची क्षमता असून या योजनेसाठी केंद्र शासनाने तीन कोटी 32 लक्ष रुपये व राज्य शासनाने तीन कोटी 32 लक्ष निधी या योजनेसाठी मंजूर केला असल्याची माहिती या योजनेचे उपविभागीय अभियंता जवळेकर व सहाय्यक अभियंता एन जी भोसकर यांनी दिली.
सदरील योजनेचे वरील कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या पंधरा दिवसांमध्ये या योजनेद्वारे टेस्टिंगसाठी पाणी सोडण्याचे काम केल्या जाईल अशी माहिती सुद्धा संबंधित अधिकार्याकडून प्राप्त झाली आहे. विशेषता शासनाने ठरवून दिलेल्या तारखेच्या चार महिने अगोदर ही योजना पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने इस्लापूर वासियांनी समाधान व्यक्त केले आहे. या योजनेची बहुतांशी कामे ही इस्लापूर ग्रामपंचायतच्या देखरेखी खाली होत असून वरील कामे ही चांगल्या स्वरूपाची होत असल्याची माहिती येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे व उपसरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील , ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाकलवाड यांनी दिली.