हिमायतनगर। महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिंगोलीचे मा. खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. 14 सायंकाळी ०६ वाजता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने उमेदवाराकडून प्रचार सभांचे आयोजन करून जनतेला जाहीरनाम्यात मांडण्यात आलेले मुद्दे सांगून मतदान रुपी आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाची एकही सभा हिमायतनगर शहरात झाली नाही. तर महायुतीची हिमायतनगर शहरात यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आत्ता हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची गुरुवारी जाहीर सभा होणार आहे.
या सभेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर.पी. आय (आ), पिपल्स रिपब्लिकन पक्ष (क), लहुजी शक्ती सेना ८४-हदगाव- हिमायतनगर मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह महायुतीचे मित्रपक्षाचे अनेक मंडळी, मान्यवर नेते देखील उपस्थित राहणार आहेत. मा. खासदार तथा ढाण्यावाघ म्हणून सर्वपरिचित असलेले सुभाषराव वानखेडे यांची जाहीर सभा गुरुवार दि. 14 नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ०६:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिमायतनगर येथे वेळेवर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या सभेतून विरोधकांच्या विविध कामासह जनतेच्या हिताच्या निर्णय व महायुतीची सत्ता आल्यास जाहीरनाम्यात आखण्यात आलेला अजेंडा व निर्णयाची माहिती सांगितली जाणार आहे. या सभेदरम्यान अनेकांचा पक्षप्रवेश देखील होणार असल्याचे सांगितले जाते आहे. नेहमी आपल्या भाषण शैलीतून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात पटाईत असलेल्या वानखेडे साहेबांची सभा म्हणजे मतदारांना एक पर्वणी असून, विरोधकांवर टीकास्त्र सोडून घायाळ करणारी असणार आहे. सभेतून वानखेडे विरोधकांचा कसा समाचार घेतील याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. एकूणच उद्याची म्हणजेच गुरुवारी होणाऱ्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर समर्थकानी केलं आहे.