श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l माहूर नगर पंचायत मध्ये हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस थोर दोन महान पुरुषांचे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम दि .23 रोजी आयोजित करण्यात आला होता.या वेळी स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस,आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

महान स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजाद हिंद सेनेची स्थापना केली. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेने भारत स्वातंत्र्य करण्यासाठी मोठे योगदान दिले. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिव सेनेच्या माध्यामातून मराठी युवकांन संघटीत करुन न्याय दिला.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले. राजकारणात कोणतेही पद घेतले नाही.

या दोन्ही नेतांचा आदर्श राज्यकर्ते व तरुणांनी घ्यावा,असे मत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केले.या वेळी नप चे मुख्यधिकारी विवेक कांदे,उप नगराध्यक्ष नाना लाड, कार्यालाईन अधीक्षक वैजनाथ स्वामी, अभियंता विशाल ढोरे, संदीप गंजलवाड,देविदास जोंधळे, विशाल मरवाडे, गणेश जाधव, सुरेंद्र पांडे, शेख मझहर, महिला कर्मचारी स्वाती ताई गुहाडे,विजय शिंदे, व इतर न पं चे कर्मचारी उपस्थित होते.
