उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड जिल्ह्यातील कार्यालय परिसरामध्ये व सर्वच तालुक्यामधील गावांमधील हॉटेल सह चहा टपरीवर चहा देण्यासाठी सर्रासपणे मायक्रो प्लास्टिक युक्त कागदी कपाचा वापर होताना अधिकाऱ्यांसह नागरिकांना पहावयास मिळत आहे. यामुळे मानवाच्या आरोग्य वर परिणाम होत असल्याचे दुसऱ्या जिल्ह्यातून बंदी घालण्यात येत आहे. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातसुध्दा कागदी कपात चहा देण्यासाठी बंदी आणावी (Ban on serving tea in a paper cups) अशी मागणी मारतळा गोळेगाव परिसरातील निर्भीड पत्रकार संजय देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.

कोरोना व्हायरस काळामध्ये हाताला हात लावल्यामुळे व्हायरसचा शिरका होतो . या भीतीने कागदी कपाचा उपयोग केला गेला पण कोरोना व्हायरस जाऊन बराच काळ झाला. तरीपण प्लास्टिक युक्त कागदी कप मात्र कोरोना व्हायरस ची आठवण ठेवून व राहून गेला .ह्या मायक्रो प्लास्टिक युक्त कागदी कपा मुळे जनु काही काचेच्या ग्लासामधे चहा देने हॉटेल मालकांना अवघड वाटत आहे.काचेचा ग्लास धुण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते व त्यासाठी मजुरी द्यावी लागते . त्या व्यक्तीच्या मजुरीमध्ये दिवसभर डोक्याला ताण न घेता कागदी कपामध्ये चहा दिला लगेच उचलून फेकता येते .

त्यामुळे हॉटेल मालक व चहा टपरी वाले सहज मिळणाऱ्या मायक्रो प्लास्टिक युक्त कागदी कपाचा पिछा सोडण्यास तयार नाहीत. परभणी व बुलढाणा येथे कागदी कप बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्या ठिकाणी कागदी कप बंद होतात तर नांदेड मध्ये बंद करण्याचे आदेश मा. जिल्हा अधिकारी यांनी काढावेत या साठी दि.21 जानेवारी रोजी मा. जिल्हा अधिकारी यांना संजय हरिहरराव देशमुख रा.गोळेगांव ता.लोहा यांनी लेखी निवेदन देऊन विनंती केली आहे.तरी पन मायक्रो प्लास्टिक युक्त कागदी कप बंद न केल्यास दिनांक 27 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनात कळवले आहे.

मायक्रो प्लॅस्टिक युक्त कागदी कप तयार करतेवेळी बी.पी.ए .नामक केमिकल चा वापर करून हा कप तयार करण्यात येतो त्यामुळे चहा पिणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या पोटामध्ये सूक्ष्म असे प्लास्टिक कन जातात व ते गंभीर स्वरूपाच्या कॅन्सर सारख्या आजारास निमंत्रण देतात. कागदी कपामध्ये चहा पितेवेळेस प्रत्येक नागरिकाला वाटते या कपामध्ये चहा पिणे बरोबर नाही तरी पण ना ईलाजास्तव ते चहा पितात करोन व्हायरस काळामध्ये आलेला कागदी कप आता बंद करण्यात यावा असे प्रत्येक नागरिकांना वाटत आहे. याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पत्रकार संजय देशमुख यांनी केली आहे.
