नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांच्यी नेमणूक करणे गरजेचे असुन कार्यालय येथील कर्मचारी यांच्या उपस्थितीती सह अनेक योजना जनजागृती व आर्थिक उत्पन्न वाढ करण्यासाठी समन्वयक म्हणून नेमणूक करणे अपेक्षित असल्याचे बोलल्या जात आहे.
नवामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे आतापर्यंत मुख्यालय यांच्या कडून अनेक प्रकरणांत काना डोळा करण्यात येत असल्याने अधिकारी , कर्मचारी समन्वय अभाव, दैनंदिन उपस्थिती बाबत मनमानी, यासह नाव परिवर्तन, नवीन मालमत्ता क्रमांकासाठी संचिका यासह अनेक मालमत्ता धारक प्रश्न अनुत्तरित आहेत तर गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता सर्व्ह न झाल्याने अनेक अपार्टमेंट व नवीन वसाहतीतील अनेक मालमत्ता नोंदणी केली नाही, परिणामी मनपाचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. कार्यालयीन कामकाज साठी नागरिक यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून पाणी पुरवठा, दिवाबत्ती, मलनिस्सारण , साफसफाई या मुलभूत सुविधा सोडविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्फत संबंधित खाजगी व्यवस्थापन यांच्या वर अंकुश नसल्याने शेकडो तक्रारी धुळखात पडल्या आहेत.
मुख्य रस्त्यावर वरील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत तर पाणीपुरवठा दोन ते तीन दिवसाला, मलनिस्सारण स्वच्छता बाबत ही तात्काळ तक्रार निवारण नाही तर स्वच्छता दोन निरीक्षक असुन ही नसल्या सारखे असल्याने मुख्य रस्त्यालगत व अंतर्गत कचराच कचरा पसरला आहे. कार्यालयीन कामात सुसूत्रता नसल्याने कर्मचारी दैनंदिन वेळेवर उपस्थित राहत नाही, अनेक कामांचा निपटारा करण्यासाठी ओळख शिवाय काम होत नाही,अशी चर्चा आहे. मालमता धारक 27 हजार आसपास मात्र विशेष योजना , शास्ती माफी योजना यासाठी समन्वय अभावि कर निरीक्षक व वसुली लिपीक मालमता धारक यांच्या कडे न गेल्याने केवळ शंभर मालमत्ता धारक सहभागी झाल्याने थकबाकी. वसुली अल्प झाल्याने थकबाकी वसुली वर परिणाम झाला आहे.
.कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित राहण्यासाठी बायोमेट्रिक यंत्र, मालमत्ता वसुली साठी आँनलाईन कक्ष, कामांचा तपशील साठी आवक जावक नोंदणी ,यासह अनेक कामे तात्काळ करून निपटारा करावा. मनपा मुख्यालय पासून क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 शेवट वअंतर जादा व नवीन वसाहती झपाट्याने वाढत असल्याने अनेक वर्षांपासून मालमत्ता वाढत गेली व नवीन वसाहती झाल्या, नवीन नंबर, मालमत्ता सर्व्ह व ईतर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढ होणे गरजेचे असताना आहे तेच कर्मचारी एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून असल्याने मेरी मर्जी म्हणत स्वहित जोपसले असल्याने मनपाच्या आर्थिक उत्पन्नाला फटका बसला असून या ठिकाणी मनपा आयुक्त डॉ . डोईफोडे यांनी कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त नेमुन शिस्त व नागरीकाचे प्रलंबित प्रश्न सोडवावे अशी मागणी केली जात आहे..