CIDCO Regional Office : सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांच्यी नेमणूक करणे गरजेचे -NNL
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांच्यी नेमणूक करणे गरजेचे असुन कार्यालय येथील कर्मचारी यांच्या उपस्थितीती सह अनेक योजना जनजागृती व आर्थिक उत्पन्न वाढ करण्यासाठी समन्वयक म्हणून नेमणूक करणे अपेक्षित असल्याचे बोलल्या जात आहे.
नवामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे आतापर्यंत मुख्यालय यांच्या कडून अनेक प्रकरणांत काना डोळा करण्यात येत असल्याने अधिकारी , कर्मचारी समन्वय अभाव, दैनंदिन उपस्थिती बाबत मनमानी, यासह नाव परिवर्तन, नवीन मालमत्ता क्रमांकासाठी संचिका यासह अनेक मालमत्ता धारक प्रश्न अनुत्तरित आहेत तर गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता सर्व्ह न झाल्याने अनेक अपार्टमेंट व नवीन वसाहतीतील अनेक मालमत्ता नोंदणी केली नाही, परिणामी मनपाचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. कार्यालयीन कामकाज साठी नागरिक यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ...
