श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | माहूरला वळसा घालून जाणार्या पैनगंगा नदी वरील उच्च पातळी बंधाऱ्याच्या मंजुरी साठी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी प्रयत्न करून हा बंधारा गत वर्षीच त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला होता.विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेऊन आज सोमवार दि.१४ रोजी झालेल्या भूमिपूजनला आमचा विरोध असून धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय माजी खासदार हेमंत पाटलांचे आहे असे मत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र माहूर ची पेयजल समस्या मार्गी लागण्यासाठी पैनगंगा नदी वर उच्च पातळी बंधारा निर्माण करावा अशी मागणी मागील ८ ते १० वर्षापासून प्रलंबित होती,मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खा. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनात गत आठवड्यात माहूर लगतच्या पैनगंगा उच्चपातळी बंधाऱ्या संदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या कक्षात बैठक होऊन डिसेंबर २०२३ मध्ये हा विषय मार्गी लावला आहे.
त्याच वेळी भूसंपादन करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.मात्र आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आज झालेले भूमिपूजन हे श्रेय लाटण्यासाठी असून या भूमिपूजनास आमचा विरोध असल्याने आम्ही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलो. असे सांगताना खा.हेमंत पाटील यांच्याच अथक प्रयत्नाने मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा बंधारा मंजूर केला आहे, अशी पुष्ठी जोडत हेमंत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे निवेदन सुदर्शन नाईक यांनी समाज माध्यमावर फिरवले आहे.