नवीन नांदेड। हडको येथील श्रीबालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर हौसिंग सोसायटी येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता कल्याण उत्सव मध्ये नांदेड दक्षिण आ. मोहनराव हंबर्डे व मुख्यजमान सौ.जयंती श्रीकांत पल्ली हैदराबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पदमवाती लक्ष्मी बालाजी विवाह विधीवत आचार्य तत्वाने मंगलषटाके, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात हजारो भाविक भक्तांचा उपस्थित संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, ब्रह्मोत्सवा निमित्य१० ऑक्टोबर रोजी आचार्य पंडिताचा मार्गदर्शनाखाली पुरोहित सतिश गुरू पोतदार, विनायक गुरू परळीकर, इंद्रमणी दुबे,प्रकाश महाराज यांच्या मत्रोपचांराने विधीपूर्वक पुजा करण्यात आली.
यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबर्डे व पत्नी सौ.कविता ,मुख्ययजमान जयंती श्रीकांत पल्ली हैदराबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी लक्ष्मी पद्मावती कल्याण उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील हजारो महिला भाविक जेष्ठ नागरिक युवक यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा थाटामाटात करण्यात आला यावेळी पाच मंगलषटाके,महाआरती व फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशाचा गजरात हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे, सामाजीक, राजकीय व पत्रकार यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह सोहळयासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष गोवर्धन बियाणी,सचिव बाळासाहेब मोरे ,कोषाध्यक्ष चंद्रशेखर चोहाण, सहसचिव बालकृष्ण येरगेवार, संस्थापक माणिकराव देशमुख,करण सिंग ठाकूर,संतोष वर्मा, संजिवन राजे, अजय भंडारी,विवेकानंद देशमुख, प्रकाशसिंग परदेशी,सचिन नपाते, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख, यांनी सहकार्य केले.