नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी (Operation flush out) अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना गुप्त बातमीदाराकडुन जांब मार्गे कंधार कडे एक पीकअप वाहन क्र एमएच-26/ बीई- 8548 मध्ये गोवंश जातीची जनावरे कोंबून नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती.
यावरून त्यांनी तात्काळ पोउपनि गोपाळ इंद्राळे, सपोउपनी महागावकर, पोहेकॉ / श्रीरामे, पोना / टाकरस, पोकॉ/ जुने, पोकॉ/ धुतमल असे पोलीस पथक तयार करून त्यांना सदर भागात रवाना करून त्यांचे मार्फत सदर वाहनास मौजे दिग्रस जवळ रोडवर थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीचे तीन बैल किंमत 1,05,000/-रूपयाचे व पिकअप वाहन किंमती 2,00,000/- रूपयाचा असा एकूण 3,05,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गौवंश बैल जातीचे तीन जनावरे निर्दयतेने बांधून नेणारे 01. रिझवान खदीर कुरेशी 02. रौफ मस्तान कुरेशी 03. अंकुश रेश्माजी कांबळे वाहन चालक याचे विरुद्ध कंधार पोलीस स्टेशन कंधार गुरन 320/2024 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 (क) (घ) (ड) (च) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5(अ). 5 (ब) व मोटार वाहन कायदा कलम 66/192 असा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोलीस स्टेशनचे चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक, गोपाल इंद्राळे, पोलीस उपनिरीक्षक, सपोउपनी महागावकर, पोहेकों / राजेश श्रीरामे, पोना / प्रकाश टाकरस, पोकों / जुने, धुतमल, रमेश जोगपेटे यांच्या पथकाने केली. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.