नांदेड| भोकर तालुक्यातील हाडोळी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत (सन २०२०-२१ व २०२१-२२ एकञीत) सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख २ लाख रुपये, प्रमाणपत्र, व स्मृतिचिन्ह असे होते.
हाडोळी ग्रामपंचायतीने वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, वृक्षलागवड, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांद्वारे आपली कामगिरी सिद्ध केली आहे. यापूर्वी देखील या ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले असून आता या विशेष पुरस्काराने त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचा समावेश होता.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, कुठेच वळवायचं नाही सरपंच अनिता माधवराव अमृतवाड, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, भोकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव केंद्रे, उप सरपंच चेतना पाटील, जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यवहारे, शुभम तेलेवार, महेंद्र वाठोरे, नंदलाल लोकडे, ग्रामसेवक अरविंद मुनगे, माधवराव कृष्णुरे, प्रा. नागनाथ तोटावाड, गणेश चरपेलवार, माधव अमृतवाड, राम मुनगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरस्कार ग्रामपंचायतील्या याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.