Sewage Management : हाडोळी ग्रामपंचायतीला सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त -NNL
नांदेड| भोकर तालुक्यातील हाडोळी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत (सन २०२०-२१ व २०२१-२२ एकञीत) सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख २ लाख रुपये, प्रमाणपत्र, व स्मृतिचिन्ह असे होते.
हाडोळी ग्रामपंचायतीने वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, वृक्षलागवड, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांद्वारे आपली कामगिरी सिद्ध केली आहे. यापूर्वी देखील या ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले असून आता या विशेष पुरस्काराने त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर...
