मुंबई| किया इंडिया या देशातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम कार निर्मात्या कंपनीने आज नवीन लवचिक मालकीचा ‘किया सबस्क्राइब’ प्लॅन बाजारात आणला आहे. कंपनीने एएलडी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.सोबत एक सामंजस्य करार केला असून त्यातून त्यांच्या लवचिक मालकी प्रोग्राम्सचा विस्तार केला जाईल. ही भागीदारी कियाच्या लीजिंग आणि सबस्क्रिप्शन सेवा भारतभरातील १४ मोठ्या शहरांमध्ये देणार आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरगाव, अहमदाबाद, इंदोर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि जयपूर यांचा समावेश आहे.
किया लीज प्रोग्राम या दीर्घकालीन कालावधीच्या योजनांच्या यशानंतर कंपनीने लघुकालीन किया सबस्क्राइब आणला आहे. हा वेतनदार लोकांसाठी उत्तम असून गाडी वापरात लवचिकता आणण्यासाठी आहे. यात १२ ते ३६ महिन्यांचा कालावधी असून दीर्घकालीन वचनबद्धतेची गरज नाही.
किया लीझच्या लवचिक मालकी प्रोग्रामची घोषणा ३ महिन्यांपूर्वी केली गेली. ‘किया लीझ’ ही योजना विविध मायलेज पर्यायांसह २४ ते ६० महिन्यांच्या कालावधीत दीर्घकालीन मोबालिटी पर्यायांसह बी२बी ग्राहक, कॉर्पोरेट्स आणि एमएसएमईंसाठी आहे. कियाच्या सॉनेट, सेल्टोस, कॅरेन्स आणि ईव्ही६ या अनुक्रमे १७९९९, २३९९९, २४९९९ आणि १,२९,००० रुपयांच्या किमान किमतीत मासिक लीजवर उपलब्ध असतील.
किया इंडियाचे विक्री आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. हरदीप सिंग ब्रार म्हणाले की, “आमच्या लवचिक मालकी प्रोग्राम किया लीझच्या पहिल्या टप्प्याला ग्राहकांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे.त्याची रचना भारतातील कार मालकी अनुभवातील गरजा ओळखून त्यात क्रांती घडवण्यासाठी केली गेली आहे. नजीकच्या भविष्यात लीजिंग व्यवसायाची वाढीची क्षमता १ ते ३ टक्के असल्यामुळे आम्हाला त्याच्या मागील शक्ती व्हायचे आहे आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मालकीचा अनुभव द्यायचा आहे. किया सबस्क्राइबसोबत आम्ही सर्वांसाठी उत्तम दर्जाच्या मोबिलिटी सोल्यूशन्स उपलब्ध केल्या जातील याची काळजी घेऊ.”