HomeनांदेडThe Suspensionउप अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यावर केलेली निलंबणाची कारवाई ही जातीय द्वेष्यातूनच...

The Suspensionउप अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यावर केलेली निलंबणाची कारवाई ही जातीय द्वेष्यातूनच – कॉ. गायकवाड

नांदेड। नांवाशमनापाचे आयुक्त हे भा.प्र.से. सनदी अधिकारी नसल्यामुळे चोरांना सोडून सन्याश्याला शिक्षा देत आहेत. असे अनेक उदाहरण देता येतील. पाणी पुरवठा विभागातील झालेल्या चुकीमुळे उप अभियंता संघरत्न सोनसळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ही कार्यवाही जातीय द्वेष्यातून केली असल्याचा संशय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

निलंबन झालेले उप अभियंता हे बौध्द आहेत. त्याचे कारण असे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे आंदोलन मागील दीड वर्षांपासून महापालिके समोर सुरु आहे. उपरोक्त आंदोलनातील मागण्या ह्या जनवादी तसेच न्याय हक्काच्या आहेत. अनेक पुरावे सादर करूनही आयुक्त कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यास तयार नाहीत. ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत त्यांना जाणीवपूर्वक पदोन्नती देण्याचे काम डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

गुंठेवारी व पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता श्री ठाणेदार आणि श्री जकी हे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे दोघेही पट्टे कंत्राटी कामगार आहेत. आर्थिक जोखीमेची सर्व कामे या दोघा कडून करून घेतली जातात अशी खुले आम चर्चा आहे. त्यांना कार्यमुक्त करावे म्हणून हजारो लोकांचे दोन मोर्चे मनपावर काढण्यात आले आहेत. आज घडीला देखील या मागण्यासाठी मनपा समोर सीटूचे साखळी उपोषण सुरु आहे. एका क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. परंतु त्यांना उपायुक्त म्हणून पदोन्नती यांनीच दिली होती.

सीटू संघटनेने आक्षेप घेतल्यामुळे त्यांना कुठल्याही पदावर पदोन्नती देण्यात आली नसल्याचे मनपाच्या वतीने लेखी स्वरूपात कळविण्यात आले होते.
परंतु सेवा निवृत्तीच्या अगोदरच्या दिवशी त्या वादग्रस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांना उपायुक्त म्हणून पदोन्नती दिली कारण भविष्यात त्यांना सर्व लाभ घेता यावेत. हाच उदात्त हेतू आयुक्ताचा होता हे सिद्ध झाले आहे.

पाणी पुरवठा विभागात झालेल्या अनियमितता प्रकरणी केवळ उप अभियंता सोनसळे जबाबदार नाहीत. खऱ्या अर्थाने कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त,उपायुक्त व इतरही काही जन जबाबदार आहेत. त्यांच्यावरही तात्काळ निलंबणाची कार्यवाही करावी अन्यथा तडकाफडकी केलेली कार्यवाही ही जातीय द्वेष्यातून केली असे ग्राह्य धरून २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकारी महोदयांना माकप च्या वतीने निवेदन देऊन सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे माकप नांदेड तालुका सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments