Wednesday, May 13

registration list : MH-26 DA नवीन मोटारसायकल नोंदणी मालिका लवकरच सुरू

नांदेड| परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांसाठी MH-26 DA ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेअंतर्गत पसंती क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पसंती क्रमांकासाठी इच्छुक अर्जदारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डी.डी.) सादर करणे बंधनकारक असून, विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एखाद्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, संबंधित अर्जदारांना 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात येणार आहे. तरी पसंती क्रमांक घ्यावयाच्या इच्छुक वाहनधारकांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!