HomeकृषीOnline registration :हमीभावाने तूर खरेदीसाठी 20 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी नांदेड जिल्ह्यात...

Online registration :हमीभावाने तूर खरेदीसाठी 20 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी नांदेड जिल्ह्यात 23 खरेदी केंद्रे निश्चित

नांदेड| केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 साठी तूर पिकाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात एकूण 23 खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर. जी. गव्हाणे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात मुखेड, हदगाव, बिलोली, लोहा, कुंडलवाडी, अर्धापूर, देगलूर, किनवट, धर्माबाद, मुदखेडसह विविध तालुक्यांमध्ये तालुका खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व अभिनव सहकारी संस्थांमार्फत तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : चालू हंगामातील तूर पिकाची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, नोंदणी प्रक्रिया POS मशीनद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. जी. गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments