नांदेड| ज्येष्ठ नागरिक हा कुटूंबाचीच नव्हे तर समाजाची, राज्य शासनाची, देशाची अर्थात राष्ट्राची “राष्ट्रीय संपत्ती”च आहे. ज्येष्ठ नागरिक समूह हा केंद्र व राज्य शासनाच्या निकोप तथा निरोगी समाज मनाचा मानसिक, भावनिक, अर्थिक, सांस्कृतिक तथा किंबहूना सर्वच बाबींचा निखळ आरसाच आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाने “आयुष्यमान भारत योजना”, “प्रधानमंत्री वयोश्री योजना” व राज्य शासनाने “मूख्यमंत्री वयोश्री योजना” कार्यान्वित केलेल्या आहेत. पण त्या परिपूर्ण नाहीत त्या योजनांचा गरिब,गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित तथा वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार,विधवा माता व दिव्यांग ज्येष्ठ नागरिक समूहाला खास, सरळ आणि दिर्घकालीन कसल्याच अर्थिक फायद्याच्या नाहीत. अनेक क्लिष्ट अटी युक्त, व दुरापास्त आहेत. त्या योजना पासष्ठ वर्षाच्या पुढच्या ठराविक ज्येष्ठ नागरिक समूहा साठीच आहेत.साठ ते पासष्ठ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकां साठी प्रस्तूत योजना काहीहि अर्थिक फायद्याच्या नाहित.तसेच गरिब,गरजवंत असूनही त्यांनां त्वरित कसलाच व कुठलाच सरळ अर्थिक फायदा नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक समूहात प्रचंड नाराजी पसरलेलीं आहे.
म्हणून महाराष्ट्र शासनाने गरिब गरजवंत जन्मदात्या ज्येष्ठ माय-बापा साठी “मुख्यमंत्री माझे लाडके ज्येष्ठ माय-बाप योजना” निर्माण करून त्वरित कार्यान्वित करावी.या योजने अंतर्गत गरिब गरजवंत ज्येष्ठ माय-बापांना इतर राज्या प्रमाणे प्रतिमहा फक्त 3500/-रू. विना अट त्यांच्या बँक खात्यावर सरळ जमा करावेत. अन्यथा 18/9/24 रोजी “गरिब गरजवंत माय-बाप ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मूक मागणी महा पदयात्रा व लाक्षणिक एक दिवसीय आन्न-पाणी त्याग आंदोलन करू.
मा.मुख्यमंत्र्याच्या लाडल्या बहिणीं आहेत,लाडले भाऊ आहेत.मग मुख्यमंत्री महोदयांचे “गरिब गरजवंत जन्म दाते मायबाप लाडले नाहित का?जन्म दात्या माय-बापा विना लाडल्या बहिणी व लाडले भाऊ आले कुठून? . तेव्हा गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व विशेष अशी “मुख्यामंत्री माझे लाडके माय-बाप योजना “18/9/24 च्या आत कार्यान्वित करून अंमलात आणा अन्यथा आम्ही ज्येष्ठ नागरिक मागणी महापदयात्रा व लाक्षणीक अन्न-पाणी त्याग आंदोलन करू!