Dr.Hansraj Vaidya : “मुख्यमंत्री माझे लाडके ज्येष्ठ माय-बाप योजना” अंतर्गत 3500रू प्रतिमहा द्या अन्यथा आंदोलन – डाॅ.हंसराज वैद्य -NNL
नांदेड| ज्येष्ठ नागरिक हा कुटूंबाचीच नव्हे तर समाजाची, राज्य शासनाची, देशाची अर्थात राष्ट्राची "राष्ट्रीय संपत्ती"च आहे. ज्येष्ठ नागरिक समूह हा केंद्र व राज्य शासनाच्या निकोप तथा निरोगी समाज मनाचा मानसिक, भावनिक, अर्थिक, सांस्कृतिक तथा किंबहूना सर्वच बाबींचा निखळ आरसाच आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाने "आयुष्यमान भारत योजना", "प्रधानमंत्री वयोश्री योजना" व राज्य शासनाने "मूख्यमंत्री वयोश्री योजना" कार्यान्वित केलेल्या आहेत. पण त्या परिपूर्ण नाहीत त्या योजनांचा गरिब,गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित तथा वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार,विधवा माता व दिव्यांग ज्येष्ठ नागरिक समूहाला खास, सरळ आणि दिर्घकालीन कसल्याच अर्थिक फायद्याच्या नाहीत. अनेक क्लिष्ट अटी युक्त, व दुरापास्त आहेत. त्या योजना पासष्ठ वर्षाच्या पुढच्या ठराविक ज्येष्ठ नागरिक समूहा साठीच आहेत.साठ ते पासष्ठ वर्षाच्या ज्ये...
