बीड| खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून सुनावणीत नवनवीन दावे आणि माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने वाल्मीक कराडला (Valmik Karad) 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे कुटुंबियांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये वाल्मिक कराडवर (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. आज वाल्मिक कराडला एसआयटीने बीडच्या न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयात एसआयटी आणि सरकारी वकिलांसह वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपआपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाबाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे न्यायालयाबाहेर काहीवेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ वाल्मिक कराडच्या समर्थकांना बाजूला केलं. वाल्मिक कराडला ७ दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, न्यायलयात आज नेमकं काय-काय घडलं? याची माहिती वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे. या 7 दिवसांत वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला ७ दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, न्यायलयात आज नेमकं काय-काय घडलं? याची माहिती वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.