नांदेड| पोलीस स्टेशन विमानतळ येथे खुनाचा गुन्हा (Murder Case) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी शेख मोईन शेख महेबुब वय 27 वर्षे रा. देगलूर नाका, मिलत नगर पाण्याच्या टाकीच्या समोर असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Local Crime Branch) ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेले व उघडकीस न आलेल्या गुन्ह्यातील आरोतांचा शोध घेण्याबाबत तसेच नजिकचे कालावधीमध्ये घडलेला पोलीस स्टेशन विमानतळ, नांदेड येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे व त्यांची टीम यांनी तपासाची चक्रे फिरवुन गोपनिय माहिती काढली.

पोलीस स्टेशन विमानतळ, नांदेड गु.र.न. 12/2024 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता मधील आरोपी हा शेख मोईन शेख महेबुब वय 27 वर्षे व्यवसाय मजूरी (मिस्त्री) काम रा. देगलूर नाका, मिलत नगर पाण्याच्या टाकीच्या समोर नांदेड येथे असल्याचे निष्पन् झाले. मयत शेख सिद्दीक व आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद होवून सदरचा गुन्हा घडला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीस पोलीस स्टेशन विमानतळ (Airport Police Station) येथे ताब्यात दिले असून गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करीत आहेत.

हि कार्यवाही अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, मिलींद सोनकांबळे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, रविशंकर बामणे, चंद्रकांत स्वामी, राहुल लाठकर, तिरुपती तेलंग, सिद्धार्थ सोनसळे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे आदींनी केली आहे.
