नवीन नांदेड l महात्मा फुले अश्राम शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघाळा शाळेतील पाचवी ते आठवी वर्गातील 59 विध्यार्थ्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत असल्याने 8 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दाखल केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्यी प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे यांनी सांगितले असुन उपचारासाठी दाखल झालेल्या विध्यार्थ्यांचे लाळ ग्रंथी व अन्न नालीकेतुन अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत, या अहवाला नंतर नेमके कारण कळणार आहे.


8 फेब्रुवारी रोजी सकाळी दैनंदिन जवळपास अश्राम शाळेतील अनेक विद्यार्थी जेवण केल्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतच्या अनेक विद्यार्थी मळमळ व उलट्याचा त्रास सहन होत असल्याचे अधिक्षक सौ.रंजना इंगेवाड व कर्मचारी यांना सांगितले नंतर तात्काळ मुख्याध्यापक भगवान इंगेवाड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खाजगी वाहनाने जवळपास 59 विध्यार्थी विध्यार्थ्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तात्काळ वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दाखल केलेल्या 59 विध्यार्थी व विध्यार्थ्यांनाव वार्ड नंबर 13 मध्ये उपचार चालू आहेत.

दाखल केलेल्या विध्यार्थ्यांचे अन्न नालीकाव्दारे प्रशान केलेल्या अन्नाचे नमुने ,लाळ ग्रंथी तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून चोविस तासांच्या उपचारानंतर या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्या नंतर सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती दिली.घटनेची माहिती कळताच नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी भेट देऊन विचारपूस केली.

यावेळी वाघाळा ग्रामविकास महसूल अधिकारी डि.एम .पवार, व्यंकट इंगळे उपस्थित होते, तर सहाय्यक संचालक इतर मागासवर्गीय विभाग नांदेडचे शिवानंद नीनगिरे यांनी ही भेट देऊन विचारपूस केली आहे. जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा स्तरावर आयोजित चार दिवस मेळावा असल्याने संबंधीत विध्यार्थी हे अनेक खेळांत सहभागी झाले होते.

त्यातुन दैनंदिन प्रकृती अनेकांची अस्वस्थ व आज शाळा असल्याने दररोज प्रमाणे जेवण केल्यानंतर दुपारी 12 चा नंतर प्रारंभी चार ते पाच जणांना मळमळ व उलट्याचा त्रास होत असल्याचे सांगितले तर त्यानंतर जवळपास अनेक विद्यार्थी त्रास होत असल्याचे सांगितल्याने जवळपास 59 विध्यार्थ्यांना तात्काळ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केले असल्याचे संस्थां चालक तथा मुख्याध्यापक भगवान इंगेवाड यांनी सांगितले.
जेवणाच्या अन्नामुळे विषबाधा का शिळे पदार्थ खाल्ल्याने हे मात्र तपासणी अहवाल आल्या नंतरच कळेल, मात्र याघटने मुळे शाळेतील पालकात एकच खळबळ उडाली असून उपचारासाठी दाखल केलेल्या अनेकांनी मोबाईल वर संपर्क साधुन प्रकृती ठिक असल्याचे परिवारातील सदस्य यांना सांगितले आहे.