Mahatma Phule Ashram ; वाघाळा येथील महात्मा फुले अश्राम शाळेतील 59 विध्यार्थ्यांना मळमळ व उलट्याचा त्रास
नवीन नांदेड l महात्मा फुले अश्राम शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघाळा शाळेतील पाचवी ते आठवी वर्गातील 59 विध्यार्थ्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत असल्याने 8 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दाखल केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्यी प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे यांनी सांगितले असुन उपचारासाठी दाखल झालेल्या विध्यार्थ्यांचे लाळ ग्रंथी व अन्न नालीकेतुन अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत, या अहवाला नंतर नेमके कारण कळणार आहे.
8 फेब्रुवारी रोजी सकाळी दैनंदिन जवळपास अश्राम शाळेतील अनेक विद्यार्थी जेवण केल्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतच्या अनेक विद्यार्थी मळमळ व उलट्याचा त्रास सहन होत असल्याचे अधिक्षक सौ.रंजना इंगेवाड व कर्मचारी यांना सांगितले नंतर तात्काळ मुख्याध्यापक भगवान इंगेवाड यांच्या निदर...
