Pralhad Patil : आमदार – खासदाराने पुरग्रस्त शेतकऱ्याच्या पीक नुकसान पीकविमा बाबतीत ठोस भूमिका घ्यावी – प्रल्हाद पाटील -NNL

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव व हिमायनगर तालुक्यात मुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांचे पीकाचे प्रचड नुकसान झाले आहे. तसेच थकीत पीक विमा संदर्भात हदगाव विधानसभाक्षेञाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर व हिगोली लोकसभाचे खा. नागेश पा. अष्टीकर यांनी एकत्र बसुन ठोस निर्णय घ्यावा असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे हदगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी केली आहे.

त्यांनी दि.3 सप्टेंबर रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 1सप्टेबर2024 च्या राञीपासुन सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने थैमान घातले. तीन दिवसात नदी नाले यांना पुर येवून शेती पिकाचे प्रचड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यावर प्रचंड प्रमाणात अर्थिक संकट कोसळले आहे. हदगाव व हिमायनगर तालुक्यातील सर्व शेतक-याच्या शेतीचे पंचनामे करुन त्यांना त्वरीत नुकसानीच मोबदला देण्यात येऊन या संकटातून बाहेर काढणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी निवेदनद्वारे केली आहे.

आमदार व खासदार यांनी लक्ष घालावे…
2023 च्या खरिप पीकविमा युनायटेड इन्शुरन्स कंपनीने अनेक वेळा मागणी करुनही नुकसान पीक विमाची रक्कम दिलेली नाही. ह्या कंपनीच तालुका पातळीवर आफिस नाही… फोन बंद… त्याच्या वेबसाईड पण बंद…. विशेष म्हणजे तालुका कृषि तालुका कार्यालयने या बाबतीत पंचनामा केलेला आहे. कार्यालय नाही म्हणून लेखी पञ पण दिलेल आहे. जिल्ह्यास्तरावरील तक्रार निवारण समितीच्या बैठकीत हे सिद्ध झाल्यानंतर हदगाव विधानसभाक्षेञाचे आमदार व खासदार ह्या या बाबतीत यांनी ह्या पिक विमा कंपनीच्या बाबतीत ठोस भूमिका घ्यावी. असा आशावाद शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद पाटील यांनी व्यक्त केला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button