नांदेडआरोग्य

World mental health ; “जागतिक मानसिक आरोग्य” दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

भोकर। आज दि. 10 ऑक्टोबर ” जागतिक मानसिक आरोग्य ” दिन प्रथम प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यात आली.

तालुका विधी सेवा समिती भोकर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/ प्रेरणा प्रकल्प, व ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.आर.एस. इरले सह न्यायाधीश भोकर , प्रमुख पाहुणे मा.डी.डी.माने साहेब न्यायाधीश भोकर, डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, डॉ.शाहू शिराढोणकर, मानसउपचार तज्ञ, डॉ संदेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी भोकर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक व सूत्र संचालन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य निरीक्षक यांनी केले.

IMG 20241010 WA0047 World mental health ; "जागतिक मानसिक आरोग्य" दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

मानसिक आरोग्य बदल सविस्तर मार्गदर्शन व घ्यावयाची काळजी या बाबत डॉ शाहू शिराढोणकर मानसउपचार तज्ञ यांनी केले. अध्यक्षशीय समारोप मा.आर.एस. इरले सह न्यायाधीश भोकर यांनी केले. मानसिक रुग्ण यांना औषध उपचार देण्यात आला. यावेळी न्यायालय भोकर येथील दिलिप मचेवार, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम/प्रेरणा प्रकल्प नांदेड येथील अरुण वाघमारे, रुपाली मस्के, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!