HomeनांदेडHigh Court order : कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका हुलकाने यांना कायम ठेवण्याचे उच्च...

High Court order : कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका हुलकाने यांना कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश -NNL

हिमायतनगर| मा.मुंबई उच्च न्यायालयच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठा कडुन कामारवाडीच्या सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्यावर मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियमा प्रमाणे मासीक व ग्रामसभा न घेतल्याच्या कारणावरून करण्यात आलेली अपात्रची कारवाई रद्द करत त्यांना सरपंचपदी कायम ठेवण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कामारवाडी येथील महिला सरपंच सौ.सारिका शामसुंदर हुलकाने यांनी नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्याने त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरून अपात्र करण्याची नोटीस पाठवली होते. मात्र या विरोधात सरपंच सारिका हुलकाने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायाची मागणी केली होती.

ग्रामपंचायत कामारवाडीचे पाच सदस्य अनुक्रमे संतोष उत्तमराव देवराये, उपसरपंच गोदावरी बाई प्रकाश कलाने,चंद्रकलाबाई विलास मनमंदे, सुरेखा मारुती मनमंदे आणि अमोल केशव सूर्यवंशी इत्यादींनी सरपंच हे नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेत नसल्यामुळे गावाचा विकास थांबला. त्यामुळे त्यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदावरून बडतर्फ करावे असा अर्ज नांदेड येथील ऍड काकडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता.

सदर प्रकरणात संबंधितांना नोटीसा पाठवून आपापली बाजू मांडण्याची संधी दिली व गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर यांचेकडून ग्रामसभा व मासिक सभा बाबतचा अहवाल मागवला गेला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद एकूण अहवालाचे निरीक्षण केल्यानंतर सरपंचाने नियमानुसार मासिक ग्रामसभा घेतल्या नसल्याने त्यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदावरून बडतर्फ केले होते.

परंतु सरपंच सारिका हूलकाने यांनी याविरोधात न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हुलकाने यांच्या वतीने ऍड.रवींद्र गोरे यांनी बाजू मांडत विरोधी पक्षाचे म्हणणे खोडून काढले आणि सरपंच सारिका हुलकाने यांच्यावर झालेली अपात्रतेची कारवाई रद्द करण्याची मागणी केली. यावर उच्च न्यायालयाने निकाल देताना सरपंच यांच्यावरील अपात्रतेची कारवाई रद्द करत त्यांना सरपंच पदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments