हदगांव, शेख चांदपाशा| शहरासह तालूक्यात वजनासाठी डिजिटल वजन माप काटे वापरले जात आहेत. परंतु, आता काही व्यवसिक या डिजिटल वजन माप यंत्रांतही हेराफेरी करून कमी वजनाच्या वस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होऊ लागल्याआहेत.


अलीकडच्या काळात पारड्याचे तराजू कमी होऊन डिजिटल वजन मापांची मशीन वापरली जाऊ लागली आहे. त्यामुळे तराजू पेक्षा या डिजिटल वजन मापाच्या मशीनवर लोकांचा जास्त विश्वास आणि अचूक माप मिळत आहे. शासनाच्या वजन-मापे खाते नांदेड डिजिटल वजन माप मशीन आणि पारड्याचे तराजू आणि त्यातील टाकल्या जाणाऱ्या वजनांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. तरच वजन मापात हेराफेरी करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश बसेल, अशी मागणी ग्राह-क वर्गाकडून केली जात आहे.


विश्वासाने ग्राहकांची वजनाच्या बाबतीत विक्रेत्याशी तक्रार निर्माण होत नाही. परंतु आता याही डिजिटल वजन माप यंत्रांमध्ये वजनात हेराफेरी करूनकमी वजनाच्या वस्तू दिल्या जात असल्याच्या शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. विक्रेत्यांना ग्राहकांनी याबाबतीत विचारले तर डिजिटल मशीन आहे. यात काही करता येत नाही, असे सांगितले जाते. याबाबत शहरातील काही सामाजिक कार्यकर्ता तथा काही जागरूक नागरिकांनी या बाबत हदगाव शहरात व तालुक्यात किराणा भुसार व सोयाबीन कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानवर अचानक इलेक्ट्रॉनिक वजन मापे काट्याची प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याबाबत आठ महीण्या पूर्वी वजन मापे निरीक्षक नांदेडला निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली हे अद्यापही वजन माप निरीक्षक यांनी याबाबत नेमकी काय..? कारवाई केली याची काहीच माहिती देण्यात येत नाही.




