Award | पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांना साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर

नांदेड | ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ 2026 हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य दिव्य स्वरूपातील पुरस्कार दिनांक 10 जानेवारी 2026 वार शुक्रवार ठीक सकाळी 11 वाजता साईच्या पावन व पवित्र भूमी शिर्डीत परिवार लॉन्स पॅकेट हॉल न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी शिर्डीत होत आहे.

शिर्डी संस्थानच्या वतीने सामाजिक चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने व ध्येय साध्य करणारे तसेच पत्रकारितेच्या व सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करणाऱ्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बारूळ गावातील पत्रकार सूर्यकांत लक्ष्मणराव वाघमारे बारूळकर यांना ओम साई विकास प्रतिष्ठान बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार 2026 साठी तुम्ही केलेल्या व करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तुमची निवड करण्यात आली आहे. असे साई जीवन गौरव पुरस्कार निवड समितीचे मुख्य आयोजक सुदाम संसारे सर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

बारूळ येथील पत्रकार हे मागील अनेक महिन्यापासून आपल्या सामाजिक कार्याची ओळख ही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासमोर आणून तळागळातील लोकांच्या अपेक्षांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवले व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे पत्रकार सूर्यकांत लक्ष्मणराव वाघमारे बारूळकर यांच्या कार्याची दखल शिर्डी संस्थांनी घेऊन त्यांना साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. या पुरस्काराचे मानकरी म्हणून बारूळ तालुका कंधार येथील सूर्यकांत लक्ष्मणराव वाघमारे बारूळकर यांची निवड करण्यात आली आहे सदरील सोहळा शिर्डी येथील मान्यवरांच्या उपस्थितीत व शिर्डी संस्थांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बारूळचे प्रथम नागरिक उपसरपंच शंकरराव नाईक, अनिल सावकार इतकापल्ले, जयराम कांबळे, सुधाकर सावकार तळेगाव, बाळू कोल्हे, पत्रकार गोविंद शिंदे, पत्रकार तेलंग , पत्रकार लक्ष्मण कांबळे, ग्रामविकास अधिकारी आदमपूरकर , बारूळ जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक कौशल्य , सामाजिक कार्यकर्ते चांद पठाण, रोजगार सेवक गायकवाड बाळू , उद्धव रहाटे, माजी उपसरपंच सुरेश, डाॅ. सदाशिव बनसोडे,उदय पाटील जाधव, बबलू शेख पत्रकार,वाखरडे ,पोलीस पाटील संजय पाटील जाधव ,सिद्धार्थ वाघमारे पत्रकार ,गावातील मान्यवरांनी मित्रमंडळींनी व उस्माननगर पोलीस स्टेशन, बारूळ, कवठा व उस्माननगर येथील पत्रकार, व कंधार तालुक्यातून पत्रकार , शासकीयअधिकारी, पदाधिकारी व मित्र परिवार यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button