हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात शुक्रवारी आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय (आरोग्य) आढावा बैठकपार पडल्याची माहिती मिळाली आहे. सदर बैठकीत पक्षाच पदाधिकारी काही पत्रकार व आरोग्य अधिकारी, डॉक्टर व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक हजर असल्याची दिसून आले.


विशेष म्हणजे तालुकास्तरी आढावा बैठकीत शहरातील व तालुक्यातील स्थानिक प्रमुख नागरिक, सामाजिक कार्यकर्त, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, तालुकास्तरीय आढावा बैठकीमध्ये सहभागी होणे अपेक्षित होते. कारण हदगाव शहरातील तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कशी आहे. किती गावे दूषित पाणी पीत आहेत. डेंगू व मलेरिया सारख्या गंभीर आजाराकरिता बड्या खाजगी हॉस्पिटल कशी लूट होत आहे. याबाबत विद्यमान आमदारांच्या निदर्शनास आणली गेली असती. त्यावर लगेच चर्चा होऊन योग्य मार्गे पण निघाला असता. पण येथील आरोग्य प्रशासनाला आपल्या कार्यशैलच पितळ उघडे पडू नये म्हणून अश्या नागरिकांचा सहभाग नको होता हे स्पष्ट जाणवत आहे.

विशेष म्हणजे हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची काय..? अवस्था आहे. रक्ताचे नमुने इतर तालुक्यात तपासण्याकरिता पाठवण्यात येतात. अशी अवस्था हादगावच्या रुग्णालयाची आहे तो रिपोर्ट येईपर्यंत फार वेळ जातो. परिणामस्वरूप रुग्णाला खाजगी दवाखाना शिवाय पर्याय नसतो. शहरात तालुका आरोग्य विभागाकडे दंत तपासणी, तंबाखू सेवनामुळे होणारे आजार, गुटखा मुळे मौखिक रुग्णांची संख्या वाढत असताना स्थानिक व तालुका आरोग्य विभाग याबाबत जनजागृती का..? करत नाहीत.


याबाबत तालुक्यातील आरोग्य विभागाला शहरात व तालुक्यात जनजागृती करण्यात आली नसल्याच काहीनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. इतका मुजोरपणा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना आला कि..?प्रशासनद्वारे असे चित्र निर्माण केले जात आहे. याचा खुलासा स्वसामन्या नागरिकांपुढे होणे आवश्यक होते. विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती आ बाबुराव कदम कोहळीकर यांना असूनही त्यांनी या बाबत ह्या बैठकीत कडक अश्या सुचना प्रशासनाला द्यायला हव्या होत्या. त्यांनी पण आता प्रशासनाच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.


