Health Department : हदगांव तालुकास्तरीय आरोग्य विभागाच्या बैठकीत स्थानिय नागरिक पत्रकारांचा सहभाग का..? नको
हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात शुक्रवारी आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय (आरोग्य) आढावा बैठकपार पडल्याची माहिती मिळाली आहे. सदर बैठकीत पक्षाच पदाधिकारी काही पत्रकार व आरोग्य अधिकारी, डॉक्टर व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक हजर असल्याची दिसून आले.
विशेष म्हणजे तालुकास्तरी आढावा बैठकीत शहरातील व तालुक्यातील स्थानिक प्रमुख नागरिक, सामाजिक कार्यकर्त, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, तालुकास्तरीय आढावा बैठकीमध्ये सहभागी होणे अपेक्षित होते. कारण हदगाव शहरातील तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कशी आहे. किती गावे दूषित पाणी पीत आहेत. डेंगू व मलेरिया सारख्या गंभीर आजाराकरिता बड्या खाजगी हॉस्पिटल कशी लूट होत आहे. याबाबत विद्यमान आमदारांच्या निदर्शनास आणली गेली असती. त्यावर लगेच चर्चा होऊन योग्य मार्गे पण निघाला असता. पण येथील आरोग्य प्रशासनाला आपल्या कार्यशैलच पितळ उ...
