HomeनांदेडNavghat bridge : नावघाट पुलावर सेफ्टी अँगल बसविण्यास सुरुवात; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची...

Navghat bridge : नावघाट पुलावर सेफ्टी अँगल बसविण्यास सुरुवात; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तत्परता

नांदेड| जुन्या नांदेड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेल्या नावघाट पुलावरील सुरक्षेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पुलावर अपघातांचा धोका कायम असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने सेफ्टी अँगल बसविण्याचे काम हाती घेतले आहे.

गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ६ सप्टेंबर रोजी आनंद चतुर्दशी निमित्त हजारो भाविक आपल्या परिवारासह विसर्जन मिरवणुकीसाठी पुलावरून जाणार आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे तातडीने होणे आवश्यक होते.

शिवसेनेचे उपजिल्हा संघटक व प्रभाग क्र.१४ निरीक्षक गजानन साहेबराव हारकरे पाटील व कार्यकर्ते गणेश पेन्सिलवर यांनी पुलावर सेफ्टी अँगल बसविण्याची ठाम मागणी प्रशासनाकडे केली होती. ५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन त्वरित हलले.

409ee342 0e71 4ed5 a2d6 88077caf953a Navghat bridge : नावघाट पुलावर सेफ्टी अँगल बसविण्यास सुरुवात; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तत्परता

हारकरे पाटील म्हणाले, “जनतेची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने वेळकाढूपणा केला. मात्र आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर अखेर दखल घेण्यात आली. यामुळे विसर्जन मिरवणुकीत जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.”

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments