नांदेड l शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीने नुकताच गुणवंताचा सत्कार व करीअर मार्गदर्शन सोहळा सप्तगीरी बँक्वॅट हॉल येथे संपन्न झाला. यावेळी गेल्या तीस वर्षापासून शिवा संघटनेमध्ये अतीशय निष्ठेने, तळमळीने व सर्मर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांची वीरशैव – लिंगायत समाजासह बहुजन समाजात ओळख आहे असे प्रबोधनकार विठठल ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारी अध्यक्षपदी निवडीची घोषणा शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे यांनी केली. व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.


सदरील कार्यक्रम हा शिवा कर्मचारी महासंघाच्या सामाजीक जाणीवेतून गेल्या २८ वर्षापासून राबविला जातो. तदवतचं याही वर्षी वीरशैव लिंगायत समाजातील जाती व पोटजातीच्या २८० गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यात यावर्षीच्या यु.पी.एस.सी. परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या वेदांत माधवराव पाटील मुखेड व सुनिल स्वामी या आय.ए.एस. झालेल्या दोन यशवंताच्या पालकांचा सत्कार सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी या विचारपिठावर अध्यक्ष म्हणून प्रा. मनोहर धोंडे , प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, मुख्य अतिथी म्हणून पुर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य सरचिटणीस संजय कोठाळे, इंजी. अनिल माळगे, अॅड. बालाजी बंडे, माजी सभापती बालाजी पांडागळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ माधव पाटील उच्चेकर, डॉ वीरभद्र हिमगीरे, मराठवाडा अध्यक्ष वीरभद्र बसापूरे, उपाध्यक्ष दिगंबर मांजरमकर, मराठवाडा संघटक डॉ वैजनाथ हंगरगे, जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, विलास कापसे, शहरप्रमुख गजानन कानडे, शिवराज उमाटे, विजय हिंगमीरे आदी मान्यवर व सभागृहातील उपस्थीत समाज बंधू भगीनींनी विठठल ताकबीडे यांचे प्रचंड टाळ्याच्या गजरात अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन रविंद्र पांडागळे, प्रास्तावीक संभाजी पावडे तर आभार शिवकुमार देशमुख यांनी केले.




