Shiva Employees Federation ; विठठल ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड
नांदेड l शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीने नुकताच गुणवंताचा सत्कार व करीअर मार्गदर्शन सोहळा सप्तगीरी बँक्वॅट हॉल येथे संपन्न झाला. यावेळी गेल्या तीस वर्षापासून शिवा संघटनेमध्ये अतीशय निष्ठेने, तळमळीने व सर्मर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांची वीरशैव - लिंगायत समाजासह बहुजन समाजात ओळख आहे असे प्रबोधनकार विठठल ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारी अध्यक्षपदी निवडीची घोषणा शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे यांनी केली. व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रम हा शिवा कर्मचारी महासंघाच्या सामाजीक जाणीवेतून गेल्या २८ वर्षापासून राबविला जातो. तदवतचं याही वर्षी वीरशैव लिंगायत समाजातील जाती व पोटजातीच्या २८० गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या...
