HomeनांदेडMaharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक...

Maharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे २८ जुलै रोजी – NNL

नांदेड| भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन दि.२८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल ताज पाटील, आयटीआय जवळ नांदेड येथे आयोजित केले आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन भास्कर माणकेश्वर, पुणे अध्यक्ष फोरम ऑफ रिटायर्ड बँक एम्प्लॉईज हे करणार आहेत व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती तृप्ती आळती पुणे, अध्यक्ष नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (नोबो) या राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून फोरम ऑफ रिटायर्ड बँक एम्प्लॉईजचे महामंत्री मोहन शनवारे, पुणे, बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनचे महामंत्री एन.डी.आचलेरकर व भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगीर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

बँकींग उद्योगातील अद्यावत घडामोडी, १२ व्या द्विपक्ष करारातील बारकावे, कर्मचार्‍यांना निवृत्त झालेल्या तारखेपासून पेन्शन मिळणे, बँकेतील प्रत्येक कराराचे वेळेस पेन्शनचे अपडेशन होणे, ग्रामीण बँक पेन्शन नियमावली २०१८ मधील त्रुटी दुरुस्तीसाठी सुप्रिम कोर्टात व विविध हायकोर्टात चालू असलेल्या दाव्याची माहिती, राजीनामा दिलेल्या सर्व कर्मचार्‍यांना पेन्शन लागू होणे, गु्रप मेडीक्लेम विमा, अनुकंपा भरती इत्यादी बाबत सविस्तर माहिती विषयी मार्गदर्शन अतिथी करणार आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेची स्थापना २० ऑगस्ट २०१८ रोजी झाली आहे. संघटनेचे सततच्या कार्यामुळे ग्रामीण बँकेतील निवृत्त कर्मचार्‍यांना पेन्शन सुलभपणे लागू होण्यास मदत झाली आहे. तसेच रोखण्यात आलेले रिटायरमेंट बेनीफीट व इतर लाभ, सुविधा मिळण्यास मदत झाली आहे.

या अधिवेशनात संघटनेची पुढील दिशा, धोरण, वाटचाल ठरविण्यात येणार आहे. तरी ग्रामीण बँकेतील सर्व निवृत्त कर्मचारी, बी.एम.एस.प्रणित इतर संघटनांचे प्रतिनिधी व संघटनेचे हितेशी यांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रमोद आंबेकर, कार्याध्यक्ष जी.आर. देशमुख, प्रभारी अध्यक्ष सुदर्शन पांडागळे, सरचिटणीस राम दुगाळे, अनिल औंढेकर, राम कपाळे, अशोक तेरकर, गणेश पांडे, एल.एन.खंडेलोटे, एस.बी.जाधव, पी.जी. नाईक, शिवाजी देशमुख, व्ही.जे. पाटील, एस.एम.फुलवळकर, बी.एम.सरसे, के.वाय.कल्याणकर, व्ही.डी.जोशी, के.सी. देशमुख, एस.जी. कुलकर्णी, एच.व्ही. सिलगमवार, रमेश जयकर, डी.जी. वाघमारे, माधव वाठोरे, रमेश जकाते इत्यांदीनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments