नांदेड/हिमायतनगर| हिमायतनगर शहरात खाजगी शिकवणीच्या नावाखाली अनाधिकृत शाळा चालत असून, विद्यार्थी व पालकांची मोठ्याप्रमाणात अर्थिक लूट होत आहे. ही अनाधिकृत चालत असलेली शाळा तात्काळ बंद करण्यात यावी. अशी मागणी शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी एका निवेदनाद्वारे गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे. तात्काळ कार्यवाही झाली नाहीतर लोकशाही मार्गाने आमरण उपोषन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
गटशिक्षण अधिकारी हिमायतनगर कार्यालयाला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिमायतनगर शहरातील बसस्टैंड स्थित श्री. एन. टी. जाधव यांचे कुसुम हायटेक एन. सी. आर. टी. स्कुल हिमायतनगर मध्ये मौजे सवना, कारला, पळसपुर, डोल्हारी, सिबदरा, धानोरा, वडगाव, मंगरूळ, आंदेगाव, वाधी, दिघी, सरसम, बोरगडी, धानोरा, सिरंजनी, घारापुर, विरसणी व तालुक्यातील इतर जिल्हा परीषद शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय परीक्षेच्या शिकवणीच्या नावाखाली घेऊन शिकवणी दिली जात आहे. यामुळे जि.प. शाळेतील सर्व विध्यार्थी शाळेत अनुपस्थित राहुन शाळेच्या वेळेत (9.30 ते 4.30) प्रस्तुत शाळा श्री.एन. टी. जाधव यांचे कुसुम हायटेक एन. सी. आर. टी. स्कुल हिमायतनगर येथे हजर राहत असुन RTE बालकाची सनद 1979 नुसार या मुलांना शालेय शिक्षणापासुन वंचित ठेवल्या जात आहे.
बालकाचा शारीरीक, बौध्दीक, मानसिक विकासापासुन पालक व शिकवणी चालक या मुलांना त्याच्या अधिकारापासुन वंचित ठेवण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे शालेय शिक्षण कायदा RTE कायदा बाल अधिकार अधिनियम यांचे उलंघन असुन, बाल अधिकाराचे हनन होत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना पायाभुत शिक्षणापासुन वंचित ठेवण्यात येत आहे. त्याच बरोबर 9.30 ते 4.30 च्या दरम्यान या क्लासेसला ६ ते १४ वयोगटातील कीती मुलं मुली उपस्थित राहतात त्याचे अवलोकन करण्यासाठी एक आठवडा या शिकवणी वर्ग पाहण्यासाठी एक कर्मचारी दररोज नियमित भेट दयावी. ज्यामुळे आपणास वस्तुस्थितीची माहीती होईल. जि.प. शाळेतील शिक्षक सर्रास विर्ध्याथ्याची उपस्थिती हजेरी पटावर टाकत असल्याचे दिसत असुन, हिमायतनगर तालुक्यात शाळाबाहय विध्यार्थ्यांची संख्या कमी दाखवुन शासनाची दिशाभुल करण्याचा प्रकार चालु आहे. तरी याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
या सर्व प्रकारची दखल घेऊन तात्काळ आपल्या स्तरावरून या बाबीची सविस्तर चौकशी करून तकार कर्त्यास सविस्तर अहवाल देण्यात यावा. अन्यथा सदरील प्रकरण तक्रारकर्ते बालहक्क आयोगास पाठविण्यात येईल याची नोंद घ्यावी. मुलांच्या अधिकारापासुन शिक्षण विभाग वंचित ठेवत असल्याची तक्रार बालहक्क आयोगाकडे दाखल करण्यात येईल. असं इशाराही देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. सदरील शाळेला कुठल्याही प्रकारची शासनाची मान्यता व परवानगी नसतांना सुध्दा राजरोष पणे पालकांची दिशाभुल करून शाळेत शिकण्याची काही गरज नाही. मी सर्व शिकवितो असे सांगुन अनाधिकृत शिकवणी वर्ग चालु आहे. तरी गटशिक्षणाधिकारी या शाळेला का बंद करत नाही हा खुप मोठा प्रश्न आहे.
गटशिक्षणाधिकारी यांनी सदरील अनाधिकृत शिकवणी वर्ग १ ते ८ वर्गातील विध्यार्थी शाळेच्या वेळेत शिकवण घेत असलेल्या विध्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्याची काळजी घेवुन सदरील अनाधिकृत शिकवणी वर्ग ७ दिवसाच्या आत बंद करावे, सदरची शिकवणी बंद न केल्यास विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित लक्षात घेवुन लोकशाही मार्गाने आमरण उपोषन करण्यात येईल. असा इशारा गुरूकूल इंग्लिश मीडियम स्कूल, सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल, आर एन एस इन्टर नॅशनल स्कूल, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल व गुरूदेव प्रा. उच्च प्रा. मा.उ.मा.विद्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी नांदेड याना देण्यात आल्या आहेत.