HomeनांदेडKinwat-mahur assembly : किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी उबाठाची उमेदवारी चाचपणी सुरू -NNL

Kinwat-mahur assembly : किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी उबाठाची उमेदवारी चाचपणी सुरू -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दि. ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवार चाचपणी करण्यासाठी विधानसभाक्षेत्रात भगवा सप्ताह अभियानास सुरूवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेने मतदारसंघ निहाय उमेदवारांची चाचपणी करीत असल्याने विधानसभा संपर्क प्रमुख वेदप्रकाश पाठक हे किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात दि.४ ते ११ ऑगस्ट दरम्यान गावोगावी जाऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेत येथील अहवाल पक्षश्रेष्ठी यांच्याकडे सोपविणार आहे.

यामुळे उबाठा सेनेच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या भगवा सप्ताह संपर्क अभियाना दरम्यान उमेदवार चाचपणी करतांना वेदप्रकाश पाठक विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे, सुनिल गायकवाड,तालुका प्रमुख उमेश जाधव, उप नगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,मारुती दिवसे पाटील ,प्रशांत कोरडे , निरधारी जाधव अभिषेक जयस्वाल यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments