नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या लातूर फाटा ते भगवान बाबा चौक अँटोने प्रवास करणाऱ्या ईसमाचा बनियनचा खिशातून सोने चांदी दांगीने चोरणाऱ्या तिन जणांना ग्रामीण पोलीस स्टेशनचा गुन्हे शोध पथकाने मुद्देमालासह ऑटो जप्त केला असुन या कामगिरीबद्दल वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार ,अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत माला विरुध्द दाखल गुन्हे उघड करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.त्याअनुषंगाने दिनांक 29/11/2024 रोजी फिर्यादी यांनी पो.स्टे. ला हजर येवून फिर्याद दिली की, त्याचे मुलीच्या नविन बांधकाम केलेल्या घराचे वास्तु शांती साठी भगवान बाबा चौक येथे जात असताना दिनांक 27 रोजी वेळ 11.30 वा. सुमारास ऑटोने लातूर फाटा येथून भगवान बाबा चौक येथे जात होते.
फिर्यादीच्या बंनियानच्या खिशात असलेले प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले 1) 35 ग्रॅम वजानाचे सोन्याचे गंठण किंमत 2,73,000/- रुपये, 2) सोन्याचे दोन झुमके 10 ग्रॅम वजनाचे किंमत 78,000/- रुपये, 3) कानाचे सोन्याचे वेल 02 नग 07 ग्रॅम वजनाचे किंमत 54,600/- रुपये, 4) सोन्याची अंगठी (वेड) 10 ग्रॅम वजनाचे किंमत 78,0000/- 5) सोन्याची खड्याची अंगठी 07 ग्रॅम वजनाची किंमत 54,600/- रुपये, 06) सोन्याची नत 01 ग्रॅम वजनाची किंमत 7,800/- रुपये असा एकूण 5,46,000/- रुपयाचा माल ऑटोतून दोन अनोळखी इसम व ऑटो चालक फिर्यादीची दिशाभूल करुन चोरट्यांनी चोरून नेले आहे. वगैरे फिर्याद वरुन गुन्हा दाखल केला होता.
01 डिसेबंर रोजी महेश कोरे, पोलीस उपनिरीक्षक यांनी व टिमने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी शेख नुसरत शेख रशिद वय 42 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मश्जिद जवळ नविन मुझामपेठ ता.जि. नांदेड, अजिज खान अजमल खान वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नई आबादी दातार चौक उमेकर निवास, ता.जि. नांदेड यांचा शोध घेवून, सदरचा गुन्हा दोन दिवासात उघडकीस आणुन, आरोपीकडून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गौरव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, यांनी कौतूक केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, सतार शेख, संतोष जाधव, सुनिल गटलेवार,माधव माने, मारोती पंचलिग,शंकर माळगे, ज्ञानेश्वर कलंदर या गुन्हे शोध पथकाने तपास लावुन तीन जणांना अटक केली असून या प्रकरणी तिनं चाकी ऑटो व चोरीला गेलेला सोन्याच्या ऐवज जप्त केला आहे,या प्रकरणी अधिक तपास महेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक,हे करीत आहेत.