नांदेड| येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मराठवाडाची विभागीय बैठक संपन्न झाली, या बैठकीला शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा आमदार जगन्नाथ अभ्यंकर (Mla. Jagannath Abhyankar) यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.

या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की शिक्षकांच्या मागण्या सोडवण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरत असून, गेली अनेक वर्षापासून शिक्षक भरती होत नाही त्यामुळे शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित राहत असल्याने मान्य होत नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत हे सरकारचा हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे.

हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जयत तयारी करण्यात येत आहे, सर्व निवडणुका आम्ही ताकदीनिशी लढू आणि सत्तेत आल्यास शिक्षकांना न्याय मिळवून देऊ असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले, यावेळी मोठया प्रमाणावर शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
