नांदेड| नांदेड शहरातील मुख्य ठिकाणी असलेले नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय मुख्य इमारतीचा परिसर हा मोटार सायकल पार्किंग (Parking problem in front of the court) म्हणून उपयोग केल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. इतर कामासाठी आलेले नागरिक देखील न्यायालयाच्या आत बेशिस्त गाड्या लाऊन जाताना दिसत आहेत.

कामानिमित्त न्यायालयात जाणे येणे करताना सर्वसामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, वाहनांच्या गर्दीचा हा प्रकार बघायला मिळत असल्याने जायचं कसं असा प्रश्न पुढे येतो आहे. न्यायालयात शेकडो वाहने बेस्तीने पद्धतीने पार्किंग केल्यामुळे कोर्टाच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा मोठा मनस्ताप होत असून वाहनांच्या गर्दीतून वाट शोधावी लागत आहे.

या कडे कोर्ट प्रशासन, वकील संघ किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना लक्ष देणे गरजेचे आहे. न्यायालय परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर होत असून, काही जणांना चावा घेतल्याचे समजते आहे, या कडे प्रशासन लक्ष देईल का..? असा सूर येथे कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांतून निघत आहे.
