क्राईमनांदेड

Thieves ransacked a grocery store | हिमायतनगरच्या जनता काॅलनीत चोरट्यांनी किराणा दुकान फोडले – NNL

हिमायतनगर| शहरातील जनता काॅलनी भागातील एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून दुकानातील महत्त्वाचे साहित्य व नगदी रक्कम चोरून नेली आहे. हि घटना दि. २१ च्या रात्रीच्या दरम्यान घडली आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने या संधीचा फायदा घेत चोरट्यानी हा कार्यक्रम केला असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

शहरातील जनता काॅलनी भागात फिर्यादीचे किराणा मालाचे दुकान आहे. दिवसभर व्यापार करून रात्री दुकान मालक घरी गेले. मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला. व महत्वाचे साहित्य नगदी रक्कम २५ हजार रूपये असा एकूण ३६ हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. दुकान मालक सिद्धेश्वर शंकरराव कदम वय २५ वर्ष रा जनता काॅलनी हिमायतनगर यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोमल कांगणे ह्या करीत आहेत.

सद्यस्थितीत हिमायतनगर शहरात अवैध धंदे, चोरी, अश्या अनेक प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. मागील काही दिवसात हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडल्या आहेत, मात्र याची पोलीस दप्तरी कोणतीही नोंद झाली नाही. चक्क काही नागरिकांनी तर चोरीची फिर्याद पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी तक्रारच दिली नाही असे म्हणत आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी शहरवासीय नागरीकातून केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!