नांदेड। येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या भव्य अशा महात्मा फुले मार्केट आयआयटी रोड येथे आजघडीची नांदेडमधील सर्वात आलिशान जिम असलेल्या व्हीएफसी हेल्थ क्लब चे उद्धाटन जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू अनुप सिंग यांच्या हस्ते उद्या सोमवार दि. १ जुलै रोजी सायकांळी ५ वा. होणार आहे, व्हीएफसी हेल्थ क्लब येथे तुम्ही तुमच्या फिटनेस ध्येयांची सहज पूर्तता करण्यासोबतच शरीराला अतुलनीय सुरेखता देण्यासाठी येथील उच्च-स्तरीय सुविधांचा लाभ आनंददायी व आल्हाद दायक वातावरणात घेऊ शकणार आहेत ..
शहरातील नामाकिंत डॉक्टर असलेल्या देशमुख कुंटूबिंयापैकी डॉ पंकज देशमुख यांनी व्यायामाच्या आवडीतून आणि पुढाकारातून व्हीएफसी हेल्थ क्लब या अदयायावत आणि आधुनिक हेल्थ क्लबची मुहूर्तमेढ रोवल्या जात आहे.
व्हीएफसी हेल्थ क्लब येथील प्रीमियम ब्रँडेड उपकरणांसह सर्वोत्तम एक्सरसाईजच्या माध्यमातून फिटनेस गोल, वर्कआउट मोटिव्हेशन, जिमलाइफ, हेल्दी लाईफस्टाईल, फिटस्पिरेशन, फिटनेस जर्नी, ट्रेनहार्ड, घाम येई पर्यंतचे कार्डीओ व्यायाम, लक्झरी जिम, ग्रुप वर्कआऊट आदीमुळे तुम्ही ईच्छित असलेला उत्तम फिटनेस सहजरीत्या प्राप्त करू शकतात असा विश्वास संचालक डॉ. पंकज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला ..
शहराच्या मध्य भागात अद्यायावत हेल्थ क्लबची निर्मिती –
देशभरातील महानगरांच्या धर्तीवर नांदेड शहरातही व्यायामाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याचा विचार करून नांदेड येथील डॉ. पंकज देशमुख यांनी आपल्या व्यायामाच्या आणि फिटनेसच्या आवडीतून आपल्याही नांदेडात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिम सारखी अत्याधुनिक जिम असावी या हेतूने प्रेरित होत व्हीएफसी हेल्थ क्लब ही नांदेडातील सर्वात आधुनिक जिम उभी केली आहे या अत्याधुनिक जिममुळे नांदेडच्या वैभवात भर पडणार आहे.
बीएफसी हेल्थ क्लब म्हणजे अत्याधुनिक उपकरणाचा सुरेख मेळ
अलिकडच्या काळातील आधुनिक जीवनशैलीतील धकाधकीच्या जिवनशैलीमुळे जेवण वेळेवर नसणे, व्यायामाचा अभाव असणे यामुळे शरीर आटोक्यात राखणे अवघड बनले आहे आणि त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. व्यायामासाठी अत्याधुनिक साधने हवीच व तीही एकाच छताखाली हवीत हे समजून घेणे अत्यावश्यक आहे
व्यायाम हा काही चमत्कार नाही, त्यात सातत्य हवे, योग्य प्रमाण हवे व त्याचा योग्य असा परिणामही साधायला हवा म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जगप्रसिद्ध ब्रँड ची उपकरणे व्हीएफसी हेल्थ क्लब येथे वापरात आणली आहेत व काळानुसार व्यायामाची अनेक अत्याधुनिक साधनेही उपलब्ध करुन देण्यासाठी कायम कटीबद्ध आहोत
सोबतच भविष्यातही अधिकधिक आधुनिक उपकरणे आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील त्याबरोबरच सर्वच मोठ्या शहरात अत्याधुनिक जिममधील व्यायामाचा खर्च हा वर्षाला सर्वसाधारण ३० ते ५० हजारच्या आसपास जातो पण आपल्या नांदेडकरांचा विचार करता आपण तो १५ ते २० हजाराच्या आसपासच ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे त्यामुळे वाजवी खर्चात आपण लक्झरी आणि फिटनेस उत्कृष्टतेच्या जगात पाऊल टाकावे असे आवाहन व्हीएफसी हेल्थ क्लब चे संचालक डॉ. पंकज देशमुख यांनी केले .
संपर्क – व्हीएफसी हेल्थ क्लब, महात्मा फुले मार्केट, नांदेड, महाराष्ट्र ४३१६०२, मो. 75585 63636, 75585 68686