नांदेडकरियर

Vasantrao Naik College ; रासेयो शिबिरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद – संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांचे गौरवोद्गार

नविन नांदेड l राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या जीवनात ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब निर्माण करणारी योजना आहे. शिबिर काळात विद्यार्थ्यांनी वास्तववादी ग्रामीण जीवनाचा स्वानुभव घ्यावा, हा या शिबिराचा उद्देश आहे. धनेगाव परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिबीर काळात घेतलेले अनुभव आणि त्यासाठी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मल्लिकार्जुन करजगी यांनी व्यक्त केले.

वसरणी येथील वसंतराव नाईक मार्गदर्शन वतीने धनेगाव येथे सात दिवशीय ‘युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी ‘ विशेष वार्षिक शिबिर- २०२५’ चे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी बोलत होते.

वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.व्ही.आर.राठोड हे होते. या प्रसंगी व्यासपीठावर जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलिप काठोडे, डॉ. जी. वेणुगोपाल, आर. डी. राठोड, महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विजयकुमार मोरे, डॉ. गणेश लिंगमपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक डॉ. करजगी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार करते. या योजनेच्या माध्यमातून आपला व्यक्तीमत्व विकास करण्याची संधी विद्यार्थ्यांना असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. समाज ऋण फेडण्यासाठी रासेयो हे एक प्रभावी माध्यम आहे, असेही ते म्हणाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वीरित्या पार केल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. गणेश लिंगमपल्ले यांनी सात दिवस चाललेल्या शिबिरातील कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला.

या वेळी शिबीरार्थी दीक्षा सुर्यवंशी, धनश्री वाघमारे आणि स्नेहल हाळदे यांनी आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कु. सुहानी पवार हीने तर कु. इंदु गवाले हीने आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या रासेयो विभागाचे माजी समन्वयक डॉ. नागेश कांबळे, डॉ. सतिश शेटे, डॉ. व्यंकटेश देशमुख, डॉ. साहेबराव शिंदे, डॉ. उत्तम कानवटे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ. संतोष शिंदे, डॉ. सुनिता गरूड, डॉ. दिलिप पालिमकर, डॉ. आर.एम. कांगणे, डॉ. लालबा खरात, डॉ. राहुल सरोदे, प्रा. मुंडलोड, डॉ. शोभा वाळुककर, प्रा. कपिल इंगोले, प्रा.शशिकांत हाटकर यांसह वसंतराव नाईक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यातआली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!