किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये जसजशी प्रचाराची रणधुमाळी सुरुवात झाली . त्या त्या पद्धतीने प्रचार सभा मधून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या उडताना दिसून येत आहेत. त्यातच महायुतीचे भीमराव केराम यांनी देवेंद्र फडवणीस, पंकजा मुंडे यांच्या सभावर भर दिला. तर राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर जोर मारला असल्याचे चित्र तरी सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे त्यातच निवडणुकीत उभी राहिलेली बरीचशी ओळख नसलेली उमेदवार ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतदार संभ्रमातच आहेत.
त्यातच गावागावातील कट्ट्या कट्ट्यावर निवडणुकीची चर्चा ही जोमाने चालू आहे. पण बहुतांशी तांडेवाडी गावांमधील शेकडो मतदार ही वेठ बिगारीच्या कामासाठी परराज्यात गेलेली असल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या तालुक्यामध्ये व्हावा त्या पद्धतीने विकास न झाल्याने तरुणाच्या व बेरोजगारांच्या हाताला कामे नसल्याने प्रत्येक तांड्या वाडी मधून जवळपास 30 टक्के मतदान ही शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यांमध्ये स्थलांतरित झालेली असल्याची भयावाहा स्थिती पहावयास मिळत आहे.
या मतदारसंघातून ज्या उमेदवारांना निवडून यायचे असेल त्या उमेदवारांना या मतदारांना आणण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे. विशेषतः बाहेरगावी काम करण्यासाठी गेलेल्या या मजुरावरच उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. सद्यस्थितीत सर्वच राजकीय पक्षाची पदाधिकारी गावोगावी कट्ट्यावर जाऊन आपली बाजू पटवून देताना दिसून येत आहेत पण प्रत्यक्ष घरभेटीवर कुठल्याही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आज पर्यंत तरी भर दिला असल्याचे चित्र पहावयास मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये कुठलाही उत्साह दिसून येत नाही.