छत्रपती संभाजीनगर l इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेकडून दिनांक १४ ते १७ नोव्हेंबर (चार दिवस) राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा आय एम ए च्या दिल्ली येथील मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास १००० हुन अधिक अलिओपॅथिक डॉक्टर खेळाडू या निमित्ताने शहरात दाखल होणार आहेत.
या स्पर्धांमध्ये १३ खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे, यामध्ये पुरुष क्रिकेट, महिला क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण स्पर्धा, वॉकथॉन, मॅरेथॉन, सायक्लोथॉन, ॲथलेटिक्स इत्यादी खेळ घेण्यात येणार आहेत, यासाठी शहरातील विविध मैदाने सज्ज करण्यात आलेली आहे. यामध्ये एम जी एम क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, गरवारे क्रिकेट मैदान, ए डी सी ए एन -२ सिडको क्रिकेट मैदान, इंड्यूरन्स ग्राउंड, बॅक वूड अरेना टर्फ या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना वेलकम किट, सहभाग प्रमाण पत्र , एम एम सी 6 क्रेडिट पॉईंट दिले जातील तर विजेते खेळाडूंना सन्मान पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. येणाऱ्या खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था आय एम ए कडून करण्यात आली आहे.
तसेच याच वेळी तीन दिवसीय स्पोर्ट्स मेडिसिन परिषदेचे हि आयोजन दिनांक १४ ते १६ नोव्हेंबर २०२४ या काळात द्योतन हॉल एम जी एम मेडिकल कॉलेज येथे होणार आहे. या परिषदेमध्ये शहरातील, महाराष्ट्र तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर विविध खेळांमध्ये घ्यावयाची काळजी, समस्या, निदान व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र मेडिकल कॉउंसिल कडून या परिषदेसाठी ६ पॉईंट ची अनुमती मिळाली आहे. या परिषदेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एमजीएम मेडिकल कॉलेज, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट, सी एस एम एस मेडिकल कॉलेज आणि बदनापूर मेडिकल कॉलेज तसेच शहरातील सर्व छोटे-मोठे खाजगी रुग्णालय यांचा सहभाग आहे.
या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन दिनांक १५ नोव्हेंबर रोजी द्योतन हॉल एम जी एम मेडिकल कॉलेज येथे दुपारी ५ वाजता होणार असून या प्रसंगी आय एम ए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ आर व्ही अशोकन, राष्ट्रीय सचिव डॉ अनिलकुमारजी नायक राष्ट्रीय माजी अध्यक्ष डॉ शरदकुमार अग्रवाल, आय एम ए महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ संतोष कदम सचिव डॉ. अनिल आव्हाड एम एम सी चे चेअरमन डॉ विंकी रुंगवाणी तसेच डॉ शिवकुमार उत्तुरे , डॉ जयेश लेले, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ रविंद्र कुटे व राज्य व शहर शाखेचे सर्व आजी माजी अध्यक्ष सचिव उपस्थित असणार आहेत. उदघाटन संपन्न झाल्यानंतर आय एम ए च्या सांस्कृतिक विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांचा पोवाडा व छत्रपती संभाजीनगर च्या संस्कृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या क्रीडा स्पर्धेसाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, मा. पोलीस आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यलय, महानगरपालिका, शहर वाहतूक पोलीस विभाग शहर ऍथलेटिक, सायकलिंग, बॅडमिंटन, क्रिकेट आणि इतर क्रीडा संघटना अश्या शासकीय व निमशासकीय स्थानिक संथस्थांकडून मोलाचे सहकार्य मिळत आहे.
समाजाचे आरोग्य सांभाळत सांभाळत स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम ठेवत समाजाला एक चांगला संदेश देण्याचा चांगला प्रयत्न आम्ही करत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ उज्वला दहिफळे यांनी संगीतले. मागील दोन महिन्यापासून सर्व आजी-माजी अध्यक्ष – सचिव, सर्व पदाधिकारी, आयोजन समिती सदस्य या कामी अहोरात्र मेहनत घेत आहेत तर सर्वच शहर , स्वागत समिती सदस्य आणि इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखा येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आतुर असल्याचे मा. सचिव डॉ विकास देशमुख यांनी सांगितले.
डॉक्टर फिट तर समाज फिट..!
आय एम ए छत्रपती संभाजीनगर अध्यक्षा डॉ उज्वला दहिफळे , सचिव डॉ विकास देशमुख व आय एम ए छत्रपती संभाजीनगर आयोजन समिती च्या वतीने स्पर्धेत उत्पूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉक्टर हे समाजाच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस सेवा देत असतात त्यासोबत डॉक्टरांनी ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेळ द्यावा आयरन मॅन किताब विजेते डॉक्टर प्रफुल जटाळे यांनी सांगितले आहे