Raincoats Distribute: किरण बंडे यांनी केले मेंढ्यांच्या सेवेकऱ्यांना रेनकोट वाटप

नांदेड| यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील नांदेड येथील जनसंपर्क अधिकारी किरण बंडे यांनी श्री संत बाळूमामा पालखी क्रमांक 12 येथील मेंढी पालन सेवेकऱ्यांसाठी पावसापासून सुरक्षेसाठी 17 रेनकोट चे वाटप केले.

श्री संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांचा कळप हा संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतो. सध्या पाणी पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे पावसापासून संरक्षण व्हावं या हेतूने मेंढ्यांच्या सेवेकऱ्यांना श्री किरण बंडे यांनी सामाजिक भावनेतून ही मदत केली आहे.

तसेच सध्या श्री संत बाळूमामाची पालखी मुखेड तालुक्यातील शिकारा या गावी असून, त्याबद्दल पालखीचे कारभारी श्री सुरनर यांनी नारळ व भंडारा देऊन त्यांचा सन्मान केला. किरण बंडे यांची बाळूमामा वरील असलेली श्रद्धा पाहून त्यांनी केलेल्या मेतके बंधूंसाठी केलेल्या सेवेबद्दल सर्वच भाविकांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button