
हिमायतनगर (वाढोणा/वारणावती) नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वर भगवान मंदिर अंदाजे सातशे 117 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. मंदिराचा इतिहास अतिप्राचीण हेमाडपंथी असून, उत्तरेकडे मुख असलेल्या मंदिरातील गाभा-यात शिवशंकर – विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती (The only standing idol of Lord Shri Parmeshwar) आहे. सर्वांग सुंदर, अत्यंत देखणी अद्वितीय अशी श्री परमेश्वराची मुर्ती एकसंघ असलेल्या काळ्या पाषाणात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा परमेश्वर म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्यातीप्राप्त आहे. या मंदिराशी जनतेची भावनीक नाळ जुळालेली असल्याने महाशीवरात्रीच्या दिवशी श्री दशर्नासाठी लाखों भवीकांची वाढोणा नगरीत मंदियाळी होते.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा /वारणावती) नगरीतील श्री परमेश्वर मुर्ती बाबत एक आख्याईका सांगीतली जाते की, येथील शेतकरी श्री गणपत माळी (दळवे पाटील) हे शेतात नांगर हाकत असतांना नांगराला एक भली मोठी शिळा लागली. येवढया मोठा काळ्या पाषाणाचा दगड कशाचा आहे, म्हणुन जमीन खोदुन शिळा बाहेर काढली असता, श्री परमेश्वराची अत्यंत सुरेख आणि रेखीव अशी मुर्ती आढळुन आली. हि वार्ता वाढोणा/वारणावती गाव परिसरात वार्यासारखी पसरली. परीसरातील नागरीक परमेश्वराची देखनी मुर्ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी करु लागले. त्यावेळी काही प्रतीष्ठीत व्यक्तींनी ज्या ठिकाणी मुर्ती नांगराला लागली त्याच ठिकाणी विधीवत प्रतीष्ठापणा करुन पुजा – अर्चना केली.
पुरण पोळीच्या पंगती केल्या, तो काळ अंदाजे 717 वर्षाहुन अधिकचा असावा, त्या काळी येथे मोगल राजवट होती. मुर्तीची प्रसीध्दी दुर- दुरवर झाल्याने गावातील प्रतीष्ठीत नागरीक व भावीक भक्तांच्या मदतीने विडुळ उमरखेड येथील तात्या पौळकर यांनी सन 1309 साली परमेश्वराचे मंदिर (Lord Shri Parmeshwar) मोठ- मोठ्या दगडी शिळाने उभारले. मंदिराच्या अंदाजे 10 फुट खोल भुयारात शंकररुपी अवतारातील चतुर्भुज श्री परमेश्वराची मुर्ती उभी केली. मुर्तीची उंची 136 सेंटीमीटर, रुंदी 59 सेंटीमीटर आहे. वरिल उजव्या हातात जायफळ- त्रीशुळ, डाव्या हातात फना काढलेला शेषनाग व पार्थ धारण केलेला आहे. खालील उजव्या हातात रुद्राक्षाची जपमाळ, डाव्या हातात शंख आहे. मस्तकावर आकर्षक असा कोरीव मुकुट असुन, मध्यभागी दोन सुर्य व शीरोभागी शिवपींड आहे.
ओठावर मिशा, मस्तकाच्या पाठीमागे प्रभामंडळ, दोन्ही कानात कुंडले असून, गळ्यात कंठहार, कमरेला मेखला, दोन्ही पायात तोडे व पैंजण आणि श्रीच्या पायाजवळील एक बाजुस गरुड तर दुस-या बाजुस नंदि आणि अलंकृत सेविका आहेत. मुर्तीच्या आजुबाजुला अनेक प्रभावशाली देवी- देवतांच्या मुर्तीचे अवतार आहेत. मुर्तीला पहाणा-या भक्तांना दहा अवतार दिसत असुन, कच्छ, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौध्द व घोडयावर स्वार असलेला कळंकी अवताराचा समावेश आहे. अशी ही सर्वांसुंदर मनमोहक मुर्ती हरीहर (शंकर आणि विष्णु रुपात) दिसत असल्यामुळे देवाच्या मुर्तीला श्री परमेश्वर असे नाव दिल्या गेले असल्याचे सांगितले जाते आहे. मंदिराच्या गाभार्याचे बांधकाम पुर्वीच्या काळात अत्यंत कलाकुसरीने करण्यात आले असुन, त्यामद्ये मोठ-मोठ्या रेखीव शिळांचा उपयोग केल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसत आहे. गाभार्याच्या पुर्व आणि पश्चीम दिशेला झरोके असुन सुर्योदयाच्या वेळी सुर्याची पहीली किरणे श्रीच्या मुर्तीवर पडतात. सुर्य मावळतीच्या वेळी पश्चीम बाजुच्या झरोक्यातुन सुर्य किरणे मु्र्तीच्या पाठमोर्या भागावर पडतात. हे आजच्या विज्ञान युगातील अभियंत्याना सुध्दा आश्चर्य चकीत करणारे बांधकाम आहे.
याच मंदिरात शिवापतीचे मंदिर असुन, महादेवाची भली मोठी पिंड, निद्रावस्थेतील शेषनारायण (विष्णुची) मुर्ती, बाजुस लक्ष्मीनारायण, गणेशमुर्ती, चिंतामणी नंदि आहे. तसेच मंदिरात अन्य देवी -देवतांच्या पुरातन काळातील रेखीव मुर्त्या आहेत. मंदिराच्या आवारात काळेजी महाराजांची समाधी, नंदादीप- दिपमाळी, चिरेबंधी बारव (विहीर)असुन पुर्वी त्यामद्ये उतरण्यासाठी पायर्याही होत्या. मंदिराचा संपुर्ण भाग अंदाजे 2 एकर येवढा असुन आवाराच्या चारी बाजुने सुरक्षा भिती उभारलेल्या आहेत. पुर्व आणि उत्तरेस भव्य प्रवेश व्दार असून, जुन्या काळात गावातील प्रतीष्ठीत लोकांची समीती नेमुन मंदिराचा कार्यभार पाहील्या जात होता. त्या काळी गावातील माली पाटील, पोलीस पाटील आणि काही प्रतीष्ठीत लोक समीतीत सदस्य म्हणुन सहभागी होते.
ई.स.1962 पासुन मंदिराच्या देखरेखीसाठी ट्रस्ट कमेटी निवडण्यात आली व सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड येथील कार्यालयात हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर (Lord Shri Parmeshwar) मंदिराची नोंद करण्यात आली. प्राचीण काळापासुन महाशिवरात्रीच्या दिवशी श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी विदर्भ,मराठवाडा आंद्रप्रदेश, कर्नाटकासह दुर-दुर वरुन भावीक लाखोच्या संख्येने हजेरी लावतात. सकाळी 3 वाजल्या पासुन श्रीच्या दर्शनासाठी भावीकांची रिघ लागुन असते. महाशिवरात्रीला श्रीचा विधीवत अभिषेक व आलंकार सोहळा केला जाउन सोन्या चांदीचे भव्य दागीने मुर्तीस चढवील्या जातात. पाच दिवस दहीहंडी काल्या पर्यंन्त ही दागीने श्रीच्या मुर्तीवर असतात. तेंव्हा हि अलंकारमय परमेश्वराची मुर्ती अत्यंत देखणी व सुंदर दिसत असल्याने भक्तांचे मन प्रसन्न होउन डोळ्याचे पारणे फिटते.
ह्या मंदिराला महाराष्ट्र शासनाने सण २०१२ साली तीर्थ क्षेत्राचा दर्जा तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नामुळे दिला आहे. तत्पुर्वी मंदिर कमेटीच्या देखरेखीत भाविक भक्तांच्या देणगीतुन तळ आणि पहीला मजला असेलेले 8 शॉपींग कॉम्पेलेक्स बांधण्यात आले आहेत. यात एकुण 188 गाळे असुन, 2 मोठे हॉल आहेत. है सर्व गाळे भाड्याने दिल्याने मंदिराच्या उत्पन्नात भर पडली आहे. मंदिराला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर सांस्कृतीक सभागृह, मंदिर परिसर मैदानाचे सिमेंटीकरण शासणाच्या निधीतुन करण्यात आले आहे. तसेच मंदिराकडे जमा झालेली रक्कम व भक्तांच्या देणगीतुन श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय तळ आणि पहिला मजला, बाजुला पाकशाळा बांधण्यात आली आहे. प्रतिवर्षी यात सर्व जाती-धर्माचे शेकडो लग्णसोहळे पार पडतात. तसेच पाकशाळेचे बांधकाम करण्यात आले असुन, त्यावर १० भक्तनिवासाच्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग दुरदुरवरुन दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या रहाण्यासाठी केला जाते.
शहरात प्रवेश करण्याच्या मुख्य रस्त्यावर स्वागत कमान उभारण्यात आली असुन, यावर श्रीकृष्ण व दोन गाईंच्या मुर्त्या बसवीण्यात आल्या आहेत. एकुणच या सर्व बांधकामावर आत्तापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. मंदिराचा सर्व कारभार धर्मदाय आयुक्तांच्या निगरणीखाली चालत असुन, मंदिर कमेटीच्या विश्वस्तांची दर महिण्याला बैठक घेतली जाते. तसेच महाशिवरात्रीला भव्ययात्रा उत्सव संपन्न झाल्यानंतर व्यवहारतील पारदर्शकता तपासण्यासाठी जमा खर्चाचे ऑडीट करण्यात येते. यासह मंदिरात वर्षातुन येणाऱ्या सर्व सन, वार, उत्सवात धार्मीक, सामाजीक, किर्तन, प्रबोधन, स्पर्धात्मक, गुनवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व गणवेश वितरण यासह विवीध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवीले जातात.
सध्य स्थितीत मंदिराचा कारभार श्री परमेश्वर ट्रस्ट कमेटीचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, संचालक राजेश्वर चिंतावार, प्रकाश कोमावार, शाम पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, सौ.लताबाई मुलंगे, सौ.लताबाई पाध्ये, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, व लिपीक बाबुरावजी भोयर तसेच ( कै.ग्यानबाराव माने, कै.विक्रम शिंदे, कै.किशनरामलू मादसवार, कै. भास्करराव दुसे, कै संभाजी जाधव सर, कै.मूलचंद पिंचा, कै. लक्ष्मणराव शक्करगे, कै. देविदास मुधोळकर या सर्व जेष्ठ संचालक मंडळीचे मंदिराच्या विकास कामात भरपूर असे योगदान मिळले आहे.) एकूणच या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातुन मंदिराच्या सर्वांगीन विकासाची घौडदौड भावीक भक्तांच्या माध्यमातुन सुरु आहे.
मागील दोन वर्षात श्री परमेश्वर मंदिराच्या वैभवात भर पाडण्यासाठी रंगबिरंगी कारंजे, एलईडी टीव्ही, प्रमुख प्रवेशवद्वारापासून भव्य शेड, मंदिर परिसरात सुशोभीकरण व विद्दुत रोषणाई यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. तसेच सण २०२५ मध्ये मंदिरातील मूर्तीच्या कमानीला चांदीची झळाळी लावण्यात आल्याने मूर्तीच्या सौंदर्यात अधिकच भर पडलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्रीला तहसीलदारांच्या हस्ते सहकुटुंब श्रीच्या मूर्तीचा अभिषेक पूजा केल्यानंतर अलंकार सोहळा पार पडतो. गतवर्षी आमदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या निधीतून मंदिरामध्ये पेवर ब्लॉक व शेड बनविण्यात आले आहेत त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली असून भाविक भक्तांना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी मदत झाली आहे.
……अनिल मादसवार, नांदेड न्यूज लाईव्ह (संपादक) हिमायतनगर, जी.नांदेड. संपर्क – 9764010107
// श्री परमेश्वराची आरती //
जयशिवशंकर,सर्वेशा / परमेश्वर,हरिहरवेषा // धृ //
कर्पुरगौरा,शुभवंदना / श्रीघननीळा, मधुसुदना सदाशिव, शंभोत्रिनयना/
केेशवाच्युता, अहीशयना अखंड, मी शरण मदनदहना /
दाखवी चरण गरुड वाहना दयाळा हिमनगजामाता /
कृपा कर श्रीलक्ष्मीकांता स्तविंतो दिनवाणि, पाव निर्वाणी,गजेंद्रवाणि सोडवी तोडुनि भवपाशा /
धाव अवलिंबे जगदिशा // जय.//1//
सुशोभितजटामुकुटगंगा / धृतपदलांच्छनभुजंगा वामकरतलमंडितलिंगा /
त्रिशुळ,जपमाळ,भस्म अंगा निरंजन.निर्गुण,नि:संगा /
सगुण रुप सुंदर आभंगा,क्षितितळवंटी जगदोध्दारा /
करुणामृतसंगमधारा जाहली प्रकट,चिंतीतां लगट,शीघ्र सरसकट करी नटखट चट गट क्लेशा /
पालटवी प्राक्तनपटरेषा // जय //2 // लाविती कर्पुरदिप सांभा /
आरती करिती पद्मनाभा, दिसतसे इंद्रभुवन शोभा,कीर्तने होति,गाति रंभा निरसुन काम क्रोधलोभा /
लाभति नर दुर्लभ लाभा,व्दिजांच्या सहस्त्रावधि पंक्ति /
प्रसादें नित्य तृप्त होती,चंद्रदिप भडके,वाद्य ध्वनी धडके,पुढे ध्वज फडके,पतित जन होति निर्देाषा /
ऐकुनि भजनाच्या घोषा // जय // 3 //
दीन ब्रिद वत्स वाढविणें /यास्तव रचिलें वाढवणें,प्रभुच्या चरणाश्रयिं रहाणें /
वांच्छिति सनकादिक शाहणे,कशाला भागिरथिंत न्हाणें /
तरि नको पंढरपुर पाहणे,पहातां समुळ द:ख विसरे /
भुलोकीं वैकुंठचि दुसरें,गरुड बैलास,वाटे कैलास,चढे उल्हास विंष्णुदास पावे हर्षा /
करिता नमन आदिपुरुषा // जय // 4 // …. कवि विष्णुदास
जयशिवशंकर,सर्वेशा / परमेश्वर,हरिहरवेषा // धृ //
कर्पुरगौरा,शुभवंदना / श्रीघननीळा, मधुसुदना सदाशिव, शंभोत्रिनयना/
केेशवाच्युता, अहीशयना अखंड, मी शरण मदनदहना /
दाखवी चरण गरुड वाहना दयाळा हिमनगजामाता /
कृपा कर श्रीलक्ष्मीकांता स्तविंतो दिनवाणि, पाव निर्वाणी,गजेंद्रवाणि सोडवी तोडुनि भवपाशा /
धाव अवलिंबे जगदिशा // जय.//1//
सुशोभितजटामुकुटगंगा / धृतपदलांच्छनभुजंगा वामकरतलमंडितलिंगा /
त्रिशुळ,जपमाळ,भस्म अंगा निरंजन.निर्गुण,नि:संगा /
सगुण रुप सुंदर आभंगा,क्षितितळवंटी जगदोध्दारा /
करुणामृतसंगमधारा जाहली प्रकट,चिंतीतां लगट,शीघ्र सरसकट करी नटखट चट गट क्लेशा /
पालटवी प्राक्तनपटरेषा // जय //2 // लाविती कर्पुरदिप सांभा /
आरती करिती पद्मनाभा, दिसतसे इंद्रभुवन शोभा,कीर्तने होति,गाति रंभा निरसुन काम क्रोधलोभा /
लाभति नर दुर्लभ लाभा,व्दिजांच्या सहस्त्रावधि पंक्ति /
प्रसादें नित्य तृप्त होती,चंद्रदिप भडके,वाद्य ध्वनी धडके,पुढे ध्वज फडके,पतित जन होति निर्देाषा /
ऐकुनि भजनाच्या घोषा // जय // 3 //
दीन ब्रिद वत्स वाढविणें /यास्तव रचिलें वाढवणें,प्रभुच्या चरणाश्रयिं रहाणें /
वांच्छिति सनकादिक शाहणे,कशाला भागिरथिंत न्हाणें /
तरि नको पंढरपुर पाहणे,पहातां समुळ द:ख विसरे /
भुलोकीं वैकुंठचि दुसरें,गरुड बैलास,वाटे कैलास,चढे उल्हास विंष्णुदास पावे हर्षा /
करिता नमन आदिपुरुषा // जय // 4 // …. कवि विष्णुदास

